गणपतीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

अवघ्या दिवसांवर गणरायाचे आगमन होणार असल्याने सजावटीच्या विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांनी दादरमध्ये खूप गर्दी केल्याचे चित्र होते.

Mumbai
rush in market for Ganapati's arrival
गणपतीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

सात दिवसांवर आलेल्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला आता जोरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध शोभेच्या वस्तू, इकोफ्रेंडली मखर, प्लास्टिकची फुले, कंठी, माळा व विविध प्रकारच्या आकर्षक लायटिंगच्या तोरणांनी दादर, क्रॉफर्ट मार्केट, कुर्ला या बाजारापेठा सजल्या फुलल्या आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यंदा इकोफ्रेंडली मखर विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

rush in market for Ganapati's arrival १
साहित्य खरेदीसाठी दादरमध्ये गर्दी

विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या

प्रत्येक सणाचा रंग वेगळा असतो. हा रंग मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये हमखास दिसतो. आठवड्यावर आलेल्या गणरायाच्या आमगनाचाही विशेष रंग आता बाजारपेठांवर दिसू लागला आहे. गणरायाच्या आरास सजावटीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यामध्ये बोर्डपासून व कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेले विविध प्रकारचे इकोफ्रेंडली मखर, कंठी हार, माळा, चायनीज तोरणे, फुलांच्या आरास, विजेच्या माळा, पूजेचे साहित्य, गणपतीचे सोन्याचे दागिने, मोदक प्रसादाचे साहित्य, दूर्वा, केळीची पाने अशा साहित्यांनी बाजारापेठा फुलल्या आहेत.

हेही वाचा – दादरच्या टिळक पुलासह शहरातील १६ पुलांची मलमपट्टी

rush in market for Ganapati's arrival ३
इकोफेंडली मकरकडे ग्राहकांची पाठ

इकोफ्रेंडली मखरकडे ग्राहकांची पाठ

प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी असल्याने बाजारांमध्ये थर्माकोलचे मखर दिसत नसले तरी प्लास्टिकची आर्टिफिशयल चायनीज फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. ही फुले १५० रुपयांपासून असल्याने नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. तर इकोफ्रेंडली मखरची किंमत ही तीन हजारांपासून १२ हजारांपर्यंत आहे. इकोफ्रेंडली मखर थर्माकोल मखरच्या तुलनेत महाग असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा फरक पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी मखरची विक्री झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते आहे.

rush in market for Ganapati's arrival २
शोभेच्या माळांपर्यंत, पूजा साहित्यापासून ते फुलांपर्यंत विविध वस्तू

साहित्य खरेदीसाठी दादरमध्ये गर्दी

इकोफ्रेंडली मकर खरेदीकडे अद्याप ग्राहकांचा कल वाढला नसला तरी प्लास्टिकची फुले, तोरणे, माळा, फुलांच्या आरास, विजेच्या माळा खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी दादर बाजारपेठेतील रानडे रस्ता, आयडियल गल्ली, फूल मार्केट रविवारी सकाळपासून नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मखरपासून आरास करण्यासाठी लागणार्‍या शोभेच्या माळांपर्यंत, पूजा साहित्यापासून ते फुलांपर्यंत सगळ्याच गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यांवर झुंबड उडाली होती.