घरमुंबईआता 'मीठ'ही मिळणार रेशन दुकानात

आता ‘मीठ’ही मिळणार रेशन दुकानात

Subscribe

आतापर्यंत रेशन दुकानातून नागरिकांना गहू, तांदूळ, डाळीचे प्रकार, साखर आणि रॉकेल मिळत होते. मात्र आता जेवण रुचकर करणारे मीठ देखील रेशन दुकानात मिळणार आहे.

आतापर्यंत रेशन दुकानातून नागरिकांना गहू, तांदूळ, डाळीचे प्रकार, साखर आणि रॉकेल इत्यादी सामान मिळत होते. मात्र यापुढे रेशन दुकानात जेवणाची चव वाढवणारे मीठ देखील मिळणार आहे. रेशन दुकानातून नागरिकांना स्वस्तात मिठाची विक्री करण्यात येणार असून एक किलो मीठ नागरिकांना केवळ १४ रुपयांत उपलब्ध होणार आहे. रेशनच्या ठाणे परिमंडळामध्ये ४ हजार ९७५ क्विंटल मिठाची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती फ परिमंडळाचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली आहे.

असे देण्यात येते धान्य

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब ३५ धान्य आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य देण्यात येते. या धान्यामध्ये गहू दोन रुपये तर तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने धान्य वितरित करण्यात येत असून रेशनिंग ठाणे परिमंडळात १४३३ रेशनिंगची दुकाने आहेत.

- Advertisement -

१४ रुपये दराने मिळणार मीठ

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने रेशनिंग दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त मीठ प्रतिशिधापत्रिका १४ रुपये किलोने देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. यादरम्यान, काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वाटपही करण्यात आले होते. मात्र ठाणे परिमंडळातील नागरिकांना लवकरच स्वस्तातील मीठ रेशन दुकानातून खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे मिठाच्या विक्रीमागे दुकानदारांना प्रतिकिलो दीड रुपये इतके कमिशनही मिळणार असल्याची माहिती उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली असून आहे.

डाळींची विक्री

रेशन दुकानात आता मिठाबरोबर अनुदानित दराने चणाडाळ आणि उडीदडाळही वितरित केली जाणार आहे. चणाडाळीचा दर प्रतिकिलो ४० आणि उडीदडाळीचा प्रतिकिलो ५५ रुपये असून एक – एक किलो चणाडाळ आणि उडीदडाळ किंवा दोन्हीपैकी एक डाळ दोन किलो या कमाल मर्यादेत डाळींची विक्री करण्यात येणार आहे. ठाणे परिमंडळासाठी ५ हजार ६० क्विंटल डाळीची गरज असून यामध्ये ३ हजार ७३० क्विंटल चणाडाळ आणि १ हजार ३३० क्विंटल उडीदडाळीचा समावेश आहे. या डाळी लकरच नागरिकांना दुकानातून खरेदी करता येईल, असे वंजारी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाचा – अतिरिक्त धान्य गेले कुठे? नाशकात रेशन वितरणात तफावत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -