घरमुंबईशनिवारपर्यंत घरातला सेटटॉप बॉक्स चालूच ठेवा; नाहीतर बंद पडेल!

शनिवारपर्यंत घरातला सेटटॉप बॉक्स चालूच ठेवा; नाहीतर बंद पडेल!

Subscribe

मुंबईतल्या २ लाख डेस्क टॉप ग्राहकांना येत्या शनिवारपर्यंत घरातले सेट टॉप बॉक्स सुरू ठेवावे लागणार आहेत!

डीटीएससंदर्भात केंद्र सरकारने सेट टॉप बॉक्स सक्तीचे केल्यानंतर मुंबई आणि देशभरातील जवळपास सर्वच केबलचालक आणि डीटीपी ऑपरेटर्सनी ग्राहकांना सेट टॉप बॉक्स दिले आहेत. मात्र, आता मुंबईतल्या ग्राहकांसाठी सेट टॉप बॉक्स संदर्भात महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत सेट टॉप बॉक्स पॉवर ऑन मोडमध्ये म्हणजे सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सेट टॉप बॉक्सचं अपग्रेडेशनचं काम करण्यासाठी सेट टॉप बॉक्स सुरू ठेवावे लागणार आहेत. हे बॉक्स बंद ठेवले, तर त्यांचं अपग्रेडेशनचं काम होणार नसून ते बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

२ लाख ग्राहकांचे सेट टॉप बॉक्स होणार अपग्रेड

मुंबईतील दोन लाख केबल ग्राहकांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यासंदर्भातले मेसेज केबल ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत. त्यामुळेच सेट टॉप बॉक्स ऑन नसणाऱ्या ग्राहकांचे सेट टॉप बॉक्स अपग्रेड होणार नाही हे केबल ऑपरेटर्सने स्पष्ट केले आहे. मुंबई उपनगरातील विलेपार्ले भागातील दोन लाख ग्राहकांसाठी सेव्हन स्टार केबल नेटवर्कमार्फत हे मॅसेज ग्राहकांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या ग्राहकांचे सेट टॉप बॉक्स अपग्रेड करण्यासाठी येत्या शनिवारपर्यंत हे बॉक्स पॉवर ऑन मोडमध्ये ठेवावे लागणार आहेत. ग्राहकांच्या सेट टॉप बॉक्सचा डेटा अपडेट करण्यासाठीच हे सेट टॉप बॉक्स पॉवर मोडमध्ये सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फेसबुकने बाजारात आणला आपला सेट टॉप बॉक्स

..तर कॉल करावा लागणार!

ज्या केबल ग्राहकांचा सेट टॉप बॉक्स अपग्रेड होणार नाही, अशा ग्राहकांचा सेट टॉप बॉक्स अपडेट करण्यासाठी ग्राहकांना कॉल करावा लागेल. त्यानंतर या ग्राहकांचा सेट टॉप बॉक्स अपग्रेड करण्यात येईल. ग्राहकांच्या सुविधेसाठीच हे सेट टॉप बॉक्स अपग्रेडेशन करण्यात येत असल्याचे सेव्हन स्टारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सेव्हन स्टारव्यतिरिक्त इतर सर्व केबल ग्राहकांसाठी हा संदेश लागू नसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -