घरमुंबईरेल्वे प्रवासातील 'ती' ३० सेकंद महत्त्वाची

रेल्वे प्रवासातील ‘ती’ ३० सेकंद महत्त्वाची

Subscribe

लोकलमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आता एक शॉर्ट फिल्म येत आहे. लोकल प्रवासादरम्यान ३० सेकंद किती महत्त्वाची असतात हे यातून दाखवण्यात आलं आहे.

रेल्वे प्रवासामध्ये अनेक वेळा मोबाईल किंवा मौल्यवान वस्तुंच्या चोरीच्या घटना घडतात. मुंबईच्या लोकलमध्ये तर या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दररोज लाखोंचा माल चोर लंपास करतात. केवळ ३० सेकंदाचा वेळ आणि गेम ओव्हर! अर्थात तुमच्या या वस्तु लंपास करण्यासाी चोरांनी केवळ ३० सेकंदाचा वेळ किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो. या वेळेत तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष केल्यानंतर चोरांचं फावतं. त्यासाठी आता एक शॉर्ट फिल्म बनवण्यात आली आहे. मुंबईतील काही पत्रकार आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा उद्देशानं बनवलेला हा लघुपट दोन मिनिटांचा आहे. जनजागृती करणाऱ्या या शॉर्ट फिल्ममध्ये पत्रकार आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

काय आहे शॉर्ट फिल्ममध्ये?

मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला घाई असते ती लोकल पकडण्याची. याच घाईचा फायदा घेत चोर आपला डाव साधतात. या साऱ्या बाबींचं चित्रण या शॉर्ट फिल्ममध्ये करण्यात आलं आहे. शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन पत्रकार प्रशांत अंकुशराव यांनी केले आहे. तर मोहन दुबे यांनी त्यांना चित्रिकरणामध्ये देखील मदत केली आहे. यामध्ये त्या ३० सेकंदामध्ये दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होतात. तुमचा किती तोटा होतो हे दाखवले गेले आहे.

- Advertisement -

…आणि पकडला चोर

चित्रिकरण सुरू असताना त्यामध्ये काम करत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी एका चोराला हेरलं आणि त्याचा सायन स्थानकापर्यंत पाठलाग करत त्याला रंगेहाथ पकडले. पण, ज्याचा मोबाईल चोरीला गेला तो प्रवाशी मात्र पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास नकार देत होता. त्यानंतर जवानांनी त्याला समजावले आणि प्रवाशानं पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -