घरमुंबईसीमकार्डच्या लोकेशनने उघड केला दहशतीचा डाव

सीमकार्डच्या लोकेशनने उघड केला दहशतीचा डाव

Subscribe

मुंबईसह पुणे, सातारा, नालासोपारा येथे बॉम्बस्फोट घडवण्याच्या उद्देशाने घातपात घडवू पाहाणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना शुक्रवारी एटीएसने अटक केली. घातपात घडवण्यासाठी त्यांनी बनवलेले २० हातबॉम्ब आणि तितक्याच प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य ताब्यात घेत दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई पार पाडली. मोबाईलच्या संशयास्पद लोकेशन स्ट्रेस करता करता एटीएसच्या हाती हे घबाड लागले.

मुंबईसह पुणे, सातारा, नालासोपारा येथे बॉम्बस्फोट घडवण्याच्या उद्देशाने घातपात घडवू पाहाणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना शुक्रवारी एटीएसने अटक केली. घातपात घडवण्यासाठी त्यांनी बनवलेले २० हातबॉम्ब आणि तितक्याच प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य ताब्यात घेत दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई पार पाडली. मोबाईलच्या संशयास्पद लोकेशन स्ट्रेस करता करता एटीएसच्या हाती हे घबाड लागले. या प्रकरणी वैभव राऊत हा नालासोपारातील सनातन संस्थेचा साधक असल्याचे पोलीस सांगत आहेत. दुसरा सुधान्वा गोंधळेकर याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.  गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान संघटनेचा कार्यकर्ता असून तिसरा शरद कळसकर हिंदू जनजागृती समितीचा सक्रिय कार्यकर्ता आहे.त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

एटीएसच्या या मोहिमेने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये एकच खळबळ उडाली असून, आपला त्यांच्याशी काही संबंध नाही, असे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे.हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते घातपात घडवण्याच्या मागे असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीचा माग घेत अधिकार्‍यांनी काही व्यक्तींना हेरले होते. यात नालासोपारातील वैभव राऊत याचा समावेश होता. वैभवबरोबरच कळसकर आणि गोंधळेकर यांचे मोबाईल सीमकार्ड सतत लोकेशन बदलत असल्याची माहिती तपास अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीचा आधार घेत एटीएस या तिघांच्या पाळतीवर होते. या तिघांचे सीमकार्ड वेगवेगळ्या ठिकाणी लोकेट होत असल्याने एटीएसचा संशय अधिकच बळावला.

- Advertisement -

पाळत ठेवलेल्यांपैकी पोलिसांनी काही व्यक्तींकडे सीमकार्डची चौकशी केली तेव्हा ते दुसर्‍याकडे असल्याचे सांगितले. ज्याची माहिती मिळाली त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानेही ते तिसर्‍याकडे असल्याची माहिती दिली. तिसर्‍याकडे विचारणा केली असता तो सीम चौथ्याकडे असल्याचे सांगण्यात आल्याने एटीएस अधिकार्‍यांनी या सगळ्यांवर पाळत ठेवल्यावर त्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना मिळाली.

एटीएसच्या हाती आलेल्या माहितीनंतर अधिकार्‍यांनी गुरुवारी रात्री नालासोपार्‍यातल्या सोपारा गावात हिंदू जनजागृती समितीशी सबंधित वैभव राऊत याच्या घरी धाड टाकली. या धाडीत वैभवने त्याच्या घरी बनवलेले ८ हातबॉम्ब त्याच्या घरातून जप्त केले. शेजारीच असलेल्या त्याच्या गुदामसदृश्य दुकानातून १२ हातबॉम्ब असे एकूण २० हातबॉम्ब आणि २२ प्रकारचे बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य एटीएसच्या अधिकार्‍यांनी जप्त केले. एटीएसच्या छाप्यात स्फोटके बनवण्याच्या 22  प्रकारच्या वस्तू आढळून आल्या. यात 20 गावठी बॉम्ब,2 जिलेटिन कांड्या, 4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स , 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स , सेफ्टी फ्यूज वायर , 3 स्विच , 3 स्पेसिफिक सर्किट , 2 पॉयजन बॉटल याचा समावेश होता. वैभव राऊत याच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून शरद कळसकर या त्याच्या साथीदाराला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

तिसरा आरोपी असलेल्या सुधन्वा गोंधळेकर यालाही पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपींकडे बॉम्ब बनविण्याचे सामान कुठून आले?  त्यांनी ट्रेनिंग कुठून घेतली? या मागचा मास्टर माईंड कोण आहे? या चौकशीच्या मागे एटीएसचे अधिकारी लागले आहेत. अटक आरोपींचे सोशल मीडिया अकाऊंट तपासण्याची मोहीम एटीएसने हाती घेतली असून, यातून अधिक माहिती पुढे येईल, असा विश्वास एटीएस अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

विष बाटली कोडवर्ड?
एटीएसने नालासोपारा या ठिकाणी वैभव राऊत याच्या घरातून जप्त केलेल्या साहित्यामध्ये २ लिटरच्या विषाच्या बाटल्या आढळल्याने एटीएसचे अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेत विषाचा संबंध येत नाही. मग विषाचा वापर करण्याचे कारण काय, याची माहिती घेतली जात आहे. हे म्हणजे या व्यक्तींनी निश्चित केलेले कोडवर्ड असेल, अशी शंका एटीएसला आहे. दुसरीकडे घातपात करायचा आणि हे विष प्राशन करून जीवन संपवायचे असाही डाव यामागे आहे किंवा कसे याची माहिती घेतली जात आहे.

जप्त साहित्यातून ५० बॉम्बची निर्मिती
मोठ्या प्रमाणावर जप्त केलेल्या साहित्यातून जवळपास ५० गावठी बॉम्ब बनवले जाऊ शकतात असा अंदाज एटीएसने व्यक्त केला आहे. जी साधनसामग्री जप्त करण्यात आली. त्यावरून बॉम्ब बनवणार्‍या व्यक्तींना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते, हे स्पष्ट आहे. एटीएसच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरही प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली आहे.

सनातनचे हात वर
या प्रकरणातला मुख्य आरोपी वैभव राऊत हा हिंदू जनजागृती समितीचा एकेकाळचा सक्रिय कार्यकर्ता होता. पुढे तो सनातनसाठी काम करायचा. मात्र त्याचा जनजागृती समिती आणि सनातनशी काही संबंध नाही, असा खुलासा समितीचे संघटक सुनील घनवट यांनी केला आहे. वैभव राऊत याची अटक म्हणजे ’मालेगाव पार्ट-२’ असल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे. सनातनचा वकील असलेल्या संजीव पुनाळेकर यांनीही गृहखात्याला आरोपीच्या पिंजर्‍यात पकडले आहे.

तीनही आरोपींची पार्श्वभूमी
वैभव राऊत हा इस्टेट एजंट असून त्याचे लग्न झालेले आहे . तर शरद कळसकर हा २५ वर्षीय असून सध्या नालासोपार्‍यात वास्तव्याला आहे. पेशाने नोकरी करत असलेला कळसकर मूळचा सातार्‍याचा असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेला तिसरा सुधन्वा गोंधळकर हा बिजनेसमन असून त्याचाही संबंध हा हिंदू जनजगृती समितीशी असल्याची माहिती समोर आली आहे.

सनातन संस्थाच जबाबदार- नवाब मलिक
एटीएसने हिंदुत्ववादी संघटनांवर केलेल्या कारवाईची दखल घेत याला सनातन संस्था कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी करण्यात आलेली मागणी रास्तच होती, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

संबंध तपासणार – केसरकर
राऊत, कळसकर, गोंधळकर यांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे, याची माहिती घेऊन त्यांचे संबंध तपासले जातील, असे राज्याचे गृहराज्यमंत्री(ग्रामीण) दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -