घरमुंबईमुंबई अग्निशमन दलाच्या सहा अधिकार्‍यांना शौर्यपदक

मुंबई अग्निशमन दलाच्या सहा अधिकार्‍यांना शौर्यपदक

Subscribe

प्रभात रहांगदळेंसह सहा अधिकार्‍यांना सेवा शौर्य पदक, तर तीन अधिकार्‍यांना सेवा पदक जाहीरवांद्रे येथील एमटीएनएलच्या उत्तुंग इमारतीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेतून ८९ लोकांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाच्या सहा अधिकार्‍यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले. जीवाची पर्वा न करता तसेच अतुलनीय शौर्य आणि व्यावसायिक कुशलता दाखवत या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लोकांचे जीव वाचवले होते. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदकाने गौरविण्यात येणार आहे. तर अग्निशमन दलामध्ये १५ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावणार्‍या गुणवत्तापूर्ण अधिकार्‍यांचा राष्ट्रपती अग्निसेवा पदकासाठी तीन उपप्रमुख अधिकार्‍यांची नावे घोषित करण्यात आली आहे.

वांद्य्रामध्ये २२ जुलै २०१९ ला दुपारी तीनच्या वेळेस आग लागण्याची घटना घडली होती. जेव्हा या इमारतीला आग लागली. त्यावेळी इमारतीच्या आतील भागांमध्ये काम करणारे ८० ते ९० कामगार, कर्मचारी अडकून पडले होते. या सर्व अडकलेल्या कर्मचार्‍यांनी गच्चीवर धाव घेतली होती व गच्चीवरून मदतीसाठी धावा करत होते. यावेळी इमारतीच्या चारही बाजुला अडथळा असताना अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करतानाच गच्चीवर अडकलेल्या ८४ लोकांना सुखरुप बाहेर काढले. तसेच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अडकेल्या तीन व्यक्तींची एएलपीच्या सहायाने सुखरुप सुटका केली. त्यानंतर तब्बल २२ तास आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. त्यामुळे जीवाची पर्वा न करता, अतुलनीय शौर्य दाखवणार्‍या अधिकार्‍यांचा तसेच कर्मचार्‍यांचा गौरव राष्ट्रपती पुरस्काराने होणार आहे. राष्ट्रपतींच्या अग्निशमन सेवा शौर्य पदकासाठी राज्यातून सहा अग्निशमन अधिकार्‍यांची निवड झाली आहे. यामध्ये मुंबई अग्निशमन दलाचे सहा अधिकारी व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी दिलीप महादेव पालव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

अग्निशमन सेवा शौर्य पदक

nडॉ. प्रभात रहांगदळे (प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, संचालक, महाराष्ट् अग्निशमन सेवा)
n राजेंद्र अभयचंद्र चौधरी (उपप्रमुख अग्निशमन अधिकारी-तांत्रिक)
n रविंद्र आंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी)
n मिलिंद नामदेव दोंदे (सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी)
n अभिजित सावंत (केंद्र अधिकारी,मुंबई अग्निशमन दल)
n सुधीर वर्तक (यंत्रचालक,मुंबई अग्निशमन दल)

- Advertisement -

अग्निशमन सेवा पदक जाहीर
अग्निशमन दलाची सेवा ही गणवेशधारी असून या सेवेमध्ये कर्तव्य बजावतांना शिस्त व्यावसायिक कुशलता व शौर्य हे महत्वाचे असते. जे कर्मचारी अधिकारी व कर्मचारी दिर्घ सेवा बजावताना गुणवत्तापूर्ण सेवा बजावतात, त्यांना राष्ट्पती यांचे अग्निशमन सेवा पदक देवून गौरविण्यात येते. मुंबई अग्निशमन दलातील केलास हिवराळे, विजयकुमार पाणीग्रही आणि यशवंत जाधव या तीन उपप्रमुख अग्निशमन अधिकार्‍यांना यंदाचा राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आलेले आहे.

अग्निशमन सेवा पदक
n कैलास हिवराळे (उपप्रमुख अग्निशमन अधिकारी)
n विजयकुमार नरसिंह पाणिग्रही (उपप्रमुख अग्निशमन अधिकारी)
n यशवंत जाधव (उपप्रमुख अग्निशमन अधिकारी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -