घरमुंबईधक्कादायक! मुंबईत ६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

धक्कादायक! मुंबईत ६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

Subscribe

हैदराबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत मुली आणि महिला कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मुंबई सारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे ही लाजिरवाणी बाब आहे. मुंबईत महिला अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. मात्र, गेल्यावर्षी म्हणजे २०१८-१९ या वर्षादरम्यान मुंबईत बालात्काराच्या २२ तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ५१ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

नराधमाला अटक

मुंबईच्या कुर्ला परिसरात एका सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बलात्काराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. मात्र, या नराधमाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

हैदराबाद बलात्कारनंतरही देशात बलात्काराचे सत्र सुरुच

हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर काही नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जिवंत जाळून टाकल्याचा संतापजनक प्रकार त्यांनी केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात वातावरण तापले होते. मात्र, या घटनेनंतही ओडिशा येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. याशिवाय छत्तीसढमध्येही १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही देशात बलात्कारांच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे.


हेही वाचा – हैदराबाद घटनेनंतरही देशात बलात्कारांचे सत्र सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -