घरमुंबईकरोनाच्या लढ्यातील अग्रेसर असलेले सैनिक झाले घायाळ

करोनाच्या लढ्यातील अग्रेसर असलेले सैनिक झाले घायाळ

Subscribe

बोरीवली आणि मागाठाणे विधानसक्षा क्षेत्र मोडणार्‍या मुंबई महापालिकेच्या आर-मध्य विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियंत्रणात असली तरी त्यानंतर मात्र, रुग्णांची संख्या बुलेट ट्रेनच्या गतीने वाढताना दिसत आहेत. मागील एक महिन्यातच 600पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली आहे. परंतु बोरीवलीकरांकडून लॉकडाऊनचे पालन केले जात असले तरी, अत्यावश्यक सेवेतील महापालिका, पोलीस,आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी, कामगार मंडळी करोना विरोधात लढ्यात रस्त्यावर उतरुन काम करत होते. त्यांनाच करोनाने खिंडीत गाठत घायाळ केल्यामुळे बोरीवलीकरांना ताप भरला.

बोरीवलीतील काजूपाडा,देवीपाडा,कुलुपवाडी,चारकोप, योगीनगर आदी ठिकाणी करोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असून सध्या यासाठी 11 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यातआले आहेत.आतापर्यंत या विभागात एकूण रुग्णांची संख्या 728 वर पोहोचली असून त्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण बरे झाले. शीव, नायर या महापालिका रुग्णालयांतील डॉक्टर्स, नर्सेस यासह महापालिकेच्या इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी,कर्मचारी, कामगार, नानावटी रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयातील बोरीवतील राहणारे कर्मचारीही मोठ्यासंख्येने बाधित झाले आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या आर-उत्तर विभागात 27 एप्रिलपर्यंत 56 बाधित रुग्ण होते. त्यानंतर आज ही संख्या 700च्यावर पोहोचलेली आहे. परंतु या विभागातील मेच्या पहिल्या आठवड्यात जे 158 रुग्ण झाले होते. ते सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी अग्रेसर असलेले महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस तसेच पोलिस कर्मचारी,आरोग्य सेविका अशाप्रकारचे बाधित रुग्ण होते. त्यामुळे या 158 बाधित रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या संशयित रुग्णांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी केली. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे आर-मध्य विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी स्पष्ट केले.

माझ्या विभागात काही प्रमाणात खाटांची कमतता भासत आहे. पण दहिसरला कोविड आरोग्य केंद्र उभारले जात आहे. त्यामुळे ही समस्याही येत्या दिवसांत दूर होईल.
-गीता सिंघण,नगरसेविका, शिवसेना.

- Advertisement -

गोराई गावासह माझ्या प्रभागातील इतर भागांमध्ये अपवादात्मक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, रुग्णवाहिका ही या भागातील प्रमुख समस्या आहे.
-श्वेता कोरगावकर, नगरसेविका, काँग्रेस.

माझ्या विभागात या विभागात रुग्णवाहिका मिळते, पण रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
-विद्यार्थी सिंह, नगरसेवक, भाजप.

माझ्या विभागात झोपडपट्टी असल्याने सार्वजनिक शौचालयांमुळेच आजाराचा प्रसार होत आहे. सुरुवातीला तर लोक बिनधास्त बाहेर फिरायचे. त्यामुळे तेथील गर्दी नियंत्रणात आणताना अडचणी यायच्या. परंतु आता स्वत: लोक काळजी घेताना दिसत आहेत.
-रिध्दी भास्कर खुरसुंगे, नगरसेविका, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -