घरमुंबईराज्यभरातील एसटीचे वजनकाटे नादुरुस्त!

राज्यभरातील एसटीचे वजनकाटे नादुरुस्त!

Subscribe

सामान भाड्यात वाढ, मात्र प्रवाशांची गैरसोय

एसटी महामंडळाने नुकतेच प्रवाशांच्या सामानावर पाचपटीने भाडे वाढ केली आहे. मात्र राज्यभरातील एसटी आगार आणि बस स्थानकांवर प्रवाशांच्या सामानाचे वजन करण्यासाठी वजनकाटे नाहीत. जिथे आहेत ते वजनकाटे नादुरूस्त आहेत. तर अनेक आगारातील वजन काटे भंगारात निघाल्याने एसटी कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता वजनकाट्यांशिवाय सामानाचे योग्य वजन करायचे कसे ? असा मोठा प्रश्न एसटीच्या कर्मचार्‍यांना पडला आहे.

एसटीचे राज्यभरात मोठे जाळे असून दररोज एसटीने लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यात मोठ्या प्रमाणात सामानाचा समावेश असतो. यापूर्वी सामान वाहतुकीचे शुल्क एक पट भरावे लागत होते. मात्र आता प्रवाशांजवळ 20 किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास त्यांना पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. यांची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र प्रवाशांच्या सामानावर नवीन भाडे दर लागू करत असताना एसटीने कोणतीच तयारी केलेली नाही.

- Advertisement -

प्रवाशांचे सामान मोजण्यासाठी एसटीच्या आगार आणि प्रमुख बस स्थानकांवर वजन काटे असायचे, मात्र तेव्हापासून या वजन काट्यांचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे आज वजनकाटे धुळघात असून ते भंगारात निघाले आहे. मात्र यांची दुरस्ती न करता एसटीने सरळ पाचपटीने सामानावर भाडे वाढ केली आहे. भाडेवाढीपूर्वी अनेकदा सामानाच्या तिकीटावरून प्रवाशी आणि वाहकांमध्ये भांडणे होत नव्हती. कारण तेव्हा सामानावर एक पट भाडे होते. मात्र आता सामानाच्या भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांचे एसटीच्या वाहकांशी खडके उडाणार आहेत.

एसटीच्या वाहकांना भुर्दंड
एसटी महामंडळाने सामानाच्या भाड्यात वाढ केली असताना वाहकांकडे मात्र सामानाचे वजन कसे करायचे असा पेच पडतो आहे. अनेकवेळा वजन निश्चित माहिती नसल्याने प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. मात्र सामानाचे निश्चित वजन करण्यासाठी महामंडळाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे प्रवासी आमच्या विरोधात तक्रारी करत असतात, त्याचा भुर्दंड आम्हाला बसतो, असे एसटीच्या वाहकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

नवीन वजन काटे घेणार
राज्य परिवहन महामंडळाचे राज्यभरात एकूण 250 आगार तर 568 बस स्थानके आहेत. मात्र यापैकी अनेक आगार आणि प्रमुख बस स्थानकांवर प्रवाशांकडील सामान मोजण्यासाठी वजनकाटे नाहीत. त्यामुळे जुने वजनकाटे दुरुस्त करण्यासोबतच नवी वजन काटे घेण्याच्या विचार सुरु आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -