घरताज्या घडामोडीकोट्यवधी रुपये थकविणाऱ्या बिल्डरांच्या मालमत्तांवर टाच येणार

कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या बिल्डरांच्या मालमत्तांवर टाच येणार

Subscribe

कर दात्यांकडे १५ हजार कोटींची मालमत्ता कर थकबाकी तर बिल्डरांकडे १५०० कोटींची थकबाकी. यंदा फक्त ८०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुली

मुंबई महापालिकेला कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यातच आतापर्यंत मालमत्ता करापोटी १५ हजार कोटींची थकबाकी प्रलंबित आहे. तर बिल्डरांकडे १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. याबाबतच्या विषयाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वाचा फोडत संबंधित बिल्डरांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. त्याची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, मालमत्ता कर न भरणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

बिल्डरांकडून १५०० कोटींची थकबाकी वसूल करण्यात यावी

मुंबई महापालिकेचा १५ हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकित असल्याचा मुद्दा स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला. महापालिका सर्वसामान्य नागरिकांनी, कर दात्यांनी कर वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. मात्र कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या बिल्डरांवर मेहेरबानी का दाखवली जाते, असा सवाल करीत अगोदर त्या बिल्डरांकडून १५०० कोटींची थकबाकी वसूल करण्यात यावी अन्यथा मालमत्ता कर न भरणाऱ्या बिल्डरांच्या मालमत्तावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

- Advertisement -

पालिकेचे उत्पन्नचे प्रमुख स्त्रोत आता मालमत्ता कर

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत जकात कर पद्धती २०१७ मध्ये बंद झाली. त्यानंतर जीएसटी कर पद्धती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्नचे प्रमुख स्त्रोत आता मालमत्ता कर हेच आहे. मात्र गेल्या मार्चपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊनमुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे.

मनपाची सध्या आर्थिक परिस्थिती बेताची

डिसेंबर २०२० पर्यंत ६ हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करणे अपेक्षित असताना फक्त ८०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. वास्तविक, १५ हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकित असून ५० बिल्डर, बड्या लोकांनी १,५०० कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडत आहे. या मालमत्ता कर थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलण्यात यावा अन्यथा त्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी रवी राजा यांनी आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. मनपाची सध्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे. श्रीमंतांच्या थकीत कराचा बोजा सर्वसामान्यांच्या माथ्यावर मारु नका, अशी मागणी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली.

- Advertisement -

बडे थकबाकीदार

हॉटेल ताज लँड अँड वांद्रे : ३५ कोटी रुपये

बिच रिसॉर्ट : २२ कोटी रुपये

बॉम्बे क्रिकेट असोशिएशन : ३४ कोटी रुपये

वरळी वल्लभभाई स्टेडियम : २८ कोटी रुपये

मुंबई विमानतळ : २५ कोटी रुपये

रेडियस अँड डीझर्व्ह बिल्डर : २८.४२ कोटी

तुलसानी : २८.४३ कोटी

विमल असोसिएसट : २२.३६ कोटी

वैदेही आकाश हौसिंग : १९.५३ कोटी

शिवस्वामी कृपा : ३५ कोटी

हलकारा : २३.८९ कोती

ओमकार : २३.११ कोटी

बी.जी.शिर्के टेक्नॉलॉजी : १९.९८ कोटी


हेही वाचा – ठाण्यातील रखडलेले दोन एसआरए प्रकल्प अखेर मार्गी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -