घरमुंबई'नाटा'च्या परिक्षेत सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांचे पालक संतप्त

‘नाटा’च्या परिक्षेत सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांचे पालक संतप्त

Subscribe

कॉलेजच्या चुकीच्या व्यवस्थापन पद्धतीमुळे परिक्षा उशिराने सुरु झाली. परिक्षा सेंटरच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थी आणि पलकांमध्ये नाराजीचा सुरु आहे.

‘नाटा’च्या परिक्षेदरम्यान सावळा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आर्किटेक्टचरच्या शिक्षणासाठी ही परिक्षा घेतली जाते. रविवारी ही परिक्षा बांद्राच्या तोडानी इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात आली. परंतु, या परिक्षेसाठी योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत. ही परिक्षा सकाळी ९:३० वाजता सुरु होणार होती. परंतु, कॉलेजच्या चुकीच्या व्यवस्थापन पद्धतीमुळे परिक्षा उशिराने सुरु झाली. परिक्षा सेंटरच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थी आणि पलकांमध्ये नाराजीचा सुरु आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून परिक्षा उशिरा सुरु होण्यामागे सर्वरचे कारण देण्यात आले. या परिक्षेसाठी एकच सिस्टीम नंबर अनेक विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामुळे यातील एकाच विद्यार्थ्याचे लॉगिन झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या एका बॅचची परिक्षा सकाळी ११:४५ वाजता तर दुसऱ्या बॅचची परिक्षा १:४५ ला सुरु झाली. या परिक्षेसाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येतात. परंतु, कॉलेज प्रशासनाकडून योग्य ते नियोजन केले गेले नाही. त्यामुळे परिक्षेला उशिरा झाला. या परिक्षेमुळे विद्यार्थी आणि पालकांना दिवसभर उपाशी राहण्याची वेळ आली. परिक्षेत आकृत्या काढण्यासाठीही पुरीशी जागा या सेंटरवर नव्हती, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय या सेंटरवर २०० विद्यार्थ्यांची परिक्षा होणार होती. परंतु, या परिक्षेसाठी फक्त २ सिस्टीम होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक नाराज झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -