घरदेश-विदेशबायकोसाठी नवरा उतरला प्रचाराच्या रिंगणात

बायकोसाठी नवरा उतरला प्रचाराच्या रिंगणात

Subscribe

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासाठी त्यांचे पती आणि बॉलिवूड अभिनेता धर्मेद्र यांनी रविवारी मथुरामध्ये प्रचार केला.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी या निवडणूकीच्या काळात जोरदार प्रचाराच्या तयारीत व्यग्र असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे सगळेच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासाठी त्यांचे पती आणि बॉलिवूड अभिनेता धर्मेद्र यांनी रविवारी मथुरामध्ये प्रचार केला. यावेळी धर्मेंद्र यांनी ‘शोले’ चित्रपटातील वीरुच्या अंदाजात जनतेला संबोधित करत हेमा मालिनी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले.

हेमा मालिनीने आपल्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटवर अनेक लोकांनी असंख्य प्रतिक्रीया देखील केल्या आहेत. तसेच, हेमा मालिनीचे पती आणि बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्रही हेमा मालिनीसाठी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराकरिता रिंगणात उतरले आहेत. तसेच, मथुरेच्या सभेत त्यांनी एक भावनिक कविताही ऐकवली.

- Advertisement -

रविवारच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील मतदारसंघातील प्रचार सभेतील अनेकांना संबोधित केले. पहिल्या सभेच्या वेळी सकाळी गढवाल स्टेडिअम येथे घेण्यात आलेल्या मतदारांना वीरूच्या अंदाजात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “अरे गांव वालों अगर आपने हेमा मालिनी को अच्छे वोटों से नहीं जिताया तो इस गांव में जो टंकी है ना… मैं उस पर चढ़ जाऊंगा”, असे म्हणत हेमा मालिनींसाठी मते मागितली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -