घरमुंबईस्वप्नील जोशी सांगतोय 'एका पेरूवाल्याची गोष्ट'

स्वप्नील जोशी सांगतोय ‘एका पेरूवाल्याची गोष्ट’

Subscribe

जगात वाईट माणस आहेत, तशीच चांगलीही माणस - स्वप्नील जोशी

जगात वाईट माणस आहेत, तशीच चांगलीही माणस आहेत असाच काहीसा अनुभव अभिनेता स्वप्नील जोशी याने मुंबईच्या रस्त्यांवर आज घेतला. रस्त्यावर पेरू विकरणाऱ्या मुलाच्या निमित्ताने त्या २० मिनिटांमध्ये जगण्याचा ३६० डिग्री अॅंगलची जाणीव करून दिल्याचा अनुभव स्वप्नील जोशीने ट्विटरच्या माध्यमातून मांडला आहे. अजुनही माणुसकी जिवंत आहे, इमानदारी पहायला मिळते आहे या आपल्याला आलेल्या अनुभवाचा फोटो आणि ऑडिओ क्लिप स्वप्नीलने ट्विटरवर शेअर केली आहे.

- Advertisement -

आपल्या गाडीची दुरूस्ती सुरू असताना गाडीमध्ये बसूनच स्वप्नील हा सगळा प्रकार पाहत होता.  एका पेरूवाल्याची गाडी मुंबईच्या भर रस्त्यात उभी होती. काही जण एकत्र येऊन या मुलाला घेरले आणि उचलून नेली. पण दरम्यानच्या काळात ही पेरूची गाडी रस्त्यावर उभीच होती. या गाडीला २० ते २५ मिनिटे कोणताच मालक नव्हता. पण दरम्यानच्या काळात या पेरूच्या गाडीकडे अनेक लोक येऊन पाहत होते. अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून ते उच्चभ्रू उतरणाऱ्या गाडीतून उतरणाऱी अशी कोणतीही व्यक्ती त्या गाडीला हात लावला नाही. तसेच त्या गाडीतला एखादा पेरू उचलण्याची किंवा लुबाडून नेण्याची हिंमत केली नाही. कुतुहलाने सगळे त्या गाडीकडे पाहतात, त्या गाडीच्या मुलाचा शोध घेतात. पण गाडीतल्या वस्तूला कोणीही हात लावत नाही. हा सगळा प्रकार स्वप्नीलने गाडीत बसून पाहिला. या सगळ्या २० मिनिटांमध्ये जगात वाईट माणस आहेत, तशीच अजुनही चांगली माणस आहेत याचा अनुभव आल्याचे त्याने ट्विटवरील व्हिडिओतून सांगितले. मुंबईत अजुनही लोक इमानदार आहेत. एखाद्याच्या वस्तू चोरून किंवा लुबाडून घेण्याचा प्रकार या थोड्याशा वेळात घडला नाही याबाबतचे कुतुहल स्वप्नीलने या ऑडिओतून बोलून दाखवले. सोबतच या पेरूवाल्याचा फोटोही स्वप्नीलने शेअर केला आहे.

त्या मुलासोबत २० मिनिटांमध्ये काय घडले याची मला माहिती नाही. पण २० मिनिटानंतर तो मुलगा पुन्हा आपल्या गाडीजवळ आला. या काळात कोणताही चोरीचा किंवा लुटमारीचा प्रकार समोर आला नाही असे स्वप्नील जोशीने सांगितले. पण हा सगळा प्रसंग माणुसकीच्या दृष्टीने अतिशय सुखावणारा असा होता. यामधून जगण्याची ३६० डिग्री अॅंगलची जाणीव करून दिल्याचा अनुभव स्वप्नीलने मांडला आहे.

- Advertisement -

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -