घरमनोरंजनराज ठाकरे नालायक आहे - तनुश्री दत्ता

राज ठाकरे नालायक आहे – तनुश्री दत्ता

Subscribe

तनुश्री दत्ताने केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजणार आहे. विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत तनुश्रीने केलेलं वक्तव्य आणि त्यांच्यावर केलेला आरोप राजकीय भूकंप करण्यासाठी कदाचित पुरेसा ठरेल.

१० वर्षांपूर्वी म्हणजेच २००८मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते नाना पाटेकरांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील खळबळ माजली. पण आता या आरोपांसोबतच तनुश्री दत्ताने केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजणार आहे. विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत तनुश्रीने केलेलं वक्तव्य आणि त्यांच्यावर केलेला आरोप राजकीय भूकंप करण्यासाठी कदाचित पुरेसा ठरेल. ‘नालायक स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असंच होतं’, अशा शब्दांत तनुश्रीने राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘राज ठाकरे मला टच सुद्धा करू शकत नाहीत’

तनुश्री दत्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना नालायक म्हणून मोठा वाद सुरू केला आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान नाना पाटेकरांविषयी केलेल्या आरोपांबद्दल बोलताना तनुश्रीने हा खळबळजनक दावा केला आहे. राज ठाकरेंना नालायक म्हणतानाच तिने राज ठाकरेंना आव्हान देखील केलं आहे. राज ठाकरे किंवा मनसे मला स्पर्श देखील करू शकत नाही. एक मोठी ताकद माझ्यामागे आहे,’ अशा शब्दांत तिने राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

तुम्ही हे पाहिलंत का? – तनुश्री दत्ताच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?


‘राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती’

दरम्यान, राज ठाकरेंवर आणखीन एक मोठा आरोप करतानाच त्याचं कनेक्शन थेट बाळासाहेब ठाकरेंशी जोडलं आहे. ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. पण त्यांना ती मिळाली नाही. म्हणून मनसे हे सगळे प्रकार करत फिरते. राज ठाकरेंना मी सुद्धा लीडर व्हायच्या लायक आहे हे सिद्ध करायचं असतं. पण नालायक माणसं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला लागले, तर असंच होतं’, अशा खोचक शब्दांमध्ये तनुश्री दत्ताने राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तनुश्री PSYCHO; पब्लिसिटीसाठी नानावर आरोप – राखी सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -