तेजसच्या मुंबई मार्गासाठी मॉडर्न नाही, तर पारंपरिक वेशभूषा!

देशातल्या पहिल्या खासगी ट्रेन असलेल्या तेजसनंतर आता दुसरी तेजस मुंबई अहमदाबाद मुंबई या मार्गावर धावणार आहे. पण यामध्ये पहिल्या तेजसप्रमाणे आधुनिक नसून दुसऱ्या तेजसमधले रेल होस्टेस पारंपरिक वेसभूषेमध्ये दिसणार आहेत.

Mumbai
tejas express rail hostess
पहिली तेजस एक्स्प्रेसमधील रेल होस्टेस (डावीकडे), मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसमधील रेल होस्टेस (उजवीकडे)

गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरपासून देशाची पहिली खासगी ट्रेन सुरू झाली. तेजस एक्सप्रेस असं तिचं नाव आहे. दिल्ली – लखनऊ – दिल्ली असा मार्ग असलेली ही तेजस जितकी तिच्या नाविन्यामुळे चर्चेत होती, त्याहून अधिक त्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आलेल्या हवाई सुंदरींच्या धर्तीवर नेमण्यात आलेल्या रेल सुंदरींमुळे ती चर्चेत आली. एखाद्या प्रवासी विमानामधल्या प्रोफेशनल हवाई सुंदरींप्रमाणेच या रेल सुंदरी देखील आधुनिक वेशभूषेमध्ये तेजसमध्ये प्रवाशांना मदत देताना दिसून आल्या. मात्र, मुंबई – अहमदाबाद – मुंबई या मार्गासाठी मात्र तेजसनं वेगळी योजना केली आहे. या मार्गावर धावणाऱ्या पहिल्या-वहिल्या तेजसमध्ये आधुनिक नसून पारंपरिक गुजराती काठियावाडी वेशभूषेतल्या रेल सुंदरी दिसणार आहेत. १७ जानेवारीला भारतातल्या या दुसऱ्या खासगी ट्रेनचं उद्घाटन होत असून १९ जानेवारीपासून ती प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

tejas express rail hostess 1
दिल्ली – लखनऊ – दिल्ली या पहिल्या तेजस एक्सप्रेसमधील रेल होस्टेस आधुनिक वेशात

एअर होस्टेस नव्हे, रेल होस्टेस!

मुबई – अहमदाबाद – मुंबई या मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनची योग्य पद्धतीने चाचणी करण्यात आलेली आहे. या ट्रेनमधल्या क्रू मेंबरला ‘एअर होस्टेस’प्रमाणेच ‘रेल होस्टेस’ असं म्हटलं जाणार आहे. या युनिफॉर्ममध्ये महिलांसाठी पिवळ्या रंगाची सलवार, कुर्ता आणि डोक्यावर पांरपरिक टोपी असणार आहे. तर पुरुषांच्या युनिफॉर्ममध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट आणि डोक्यावर पारंपरित पद्धतीची टोपी असणार आहे. ही वेशभूषा नामांकित फॅशन डिझायनर्सकडून तयार करून घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या दुसर्‍या ‘तेजस’मध्ये खानपान व्यस्थेपासून ते कर्मचार्‍यांच्या वेशभूषेपर्यंत गुजराती संस्कृती दिसून येणार आहे.

tejas express rail hostess 2
मुंबई – अहमदाबाद – मुंबई तेजस एक्सप्रेसमधील रेल होस्टेस पारंपरिक गुजराती काठियावाडी वेशात

कशी आहे ‘तेजस २’?

ही गाडी सध्या १० डब्यांची आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या मदतीला एक पुरुष आणि एक महिला ‘रेल होस्टेस’ असणार आहे. त्या प्रत्येकाला दोन युनिफॉर्म देण्यात आले आहेत. असे एकूण ४० युनिफॉर्म देण्यात आले आहेत. हे २० कर्मचारी प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यासोबतच इतर मदतही करणार असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत. या सगळ्या रेल होस्टेसनी एविएशन हॉस्पिटॅलिटी आणि कस्टमर सर्विस इन्स्टिट्यूमधून प्रशिक्षण घेतले असून त्या कंत्राटावर काम करत आहेत.


वाचा सविस्तर – खासगी तेजसमध्ये दिसणार रेल्वे सुंदरी……

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here