घरमुंबईठाणे पोलिसांना महिनाभरात केवळ दोनच सुट्टया !

ठाणे पोलिसांना महिनाभरात केवळ दोनच सुट्टया !

Subscribe

तसेच या सुट्टयांचा मोबदलाही दिला जात नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ठाणे कारागृहातील पोलिसांना तब्बल दोन वर्षापासून प्रत्येक महिन्यात केवळ दोनच साप्ताहिक सुट्टया दिल्या जात आहेत. मात्र काम केलेल्या सुट्टयांचा मोबदलाही दिला जात नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील अनेक कारागृहातील पेालीसांची हिच समस्या आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दाखवून पोलिसांना साप्ताहित सुट्टया दिल्या जात नाहीत. ठाण्यातील एका पोलिसाने न्यायासाठी अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह तसेच सुधारसेवा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे गाऱ्हाण मांडल आहे. या प्रकारामुळे मानवी हक्काची गळचेपी होत असल्याची भावना एका पोलिसानी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली.

आजारपणात ही कामावर

ठाणे कारागृहात सुमारे ३५० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र कारागृहातील पोलिसांना दर आठवडयाला साप्ताहिक सुट्टी न मिळता १५ दिवसातून एकच सुट्टी दिली जाते. त्यामुळे महिनाभरात केवळ दोनच सुट्ट्या मिळत आहेत. २०१७ पासून हा प्रकार सुरू असल्याने कारागृहातील पोलीस कंटाळले आहेत. साप्ताहिक सुट्टी मिळत नसल्याने त्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजारपणातही कामावर यावे लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षापासून मनुष्यबळ कमी असल्याची ओरड सांगितली जाते असेही एका पोलिसाने सांगितले. एका कॅलेंडर वर्षातील ५२ आठवडयांचा विचार करता आठवडयाला एक याप्रमाणे एका वर्षात ५२ साप्ताहिक सुट्ट्या कारागृह कर्मचाऱ्यांना मिळायला हव्यात.

- Advertisement -

मागणी कोर्टापुढे मांडण्याची परवानगी

शासन निर्णयानुसार ८ न वापरलेल्या साप्ताहिक सुट्टयांचा मोबदला मिळत असल्याने उरलेल्या ४४ साप्ताहिक सुट्टया एक वर्षात देणे क्रमप्राप्त आहे. मात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना एका महिन्यात दोन या प्रमाणे एका कॅलेंडर वर्षात फक्त २४ साप्ताहिक सुट्टया २०१७ सालापासून दिल्या जात आहेत. उरलेल्या २० साप्ताहिक सुट्टयांच्या दिवशी कारागृह कर्मचारी हे विनामोबदला काम करावे लागत आहे. त्यामुळे न घेतलेल्या २० साप्ताहिक सुट्टयांचा कारागृह कर्मचाऱ्यांना मोबदला मिळावा किंवा त्या सुट्टया मिळाव्यात अथवा सदर मुद्दा कोर्टापुढं मांडण्यास परवानगी मिळावी अशीही मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे कारागृहताील पोलिसांचे लक्ष वेधलय.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -