घरमुंबईअल्पवयीन मुलाशी लग्न केल्यामुळे तरुणीला अटक

अल्पवयीन मुलाशी लग्न केल्यामुळे तरुणीला अटक

Subscribe

एका अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केले आहे. या महिलेने १७ वर्षीय तरुणाशी लग्न केले होते. त्यामुळे पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) महिलेला अटक केली आहे.

एका अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केले आहे. या महिलेने १७ वर्षीय तरुणाशी लग्न केले होते. त्यामुळे पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) महिलेला अटक केली आहे. सध्या ही महिला भायखळा तुरुंगात असून तिच्यासोबत एक लहान बाळही आहे. हे बाळ तिचे आणि त्या अल्पवयीन मुलाचे असल्याचा दावा तिने केला आहे. तिने जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सिनेअभिनेत्रीच्या हेअरड्रेसरला अटक

- Advertisement -

आम्ही संगतीने शरीरसंबंध ठेवले – आरोपी तरुणी

मुलाच्या आईने कुर्ला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मुलाचे २२ वर्षांच्या तरुणीने अपहरण केले होते. तिने त्याला स्वत:च्या घरात डांबून ठेवले आणि तिने बळजबरीना त्याच्याशी लग्न केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केले आहे. तिला ४ महिन्याचे बाळ आहे. ही महिला घटस्फोटीत असून तिचे दोन वेळा लग्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तरुणीने सांगितले की, ‘मी त्या मुलाशी लग्न केले असून तो सध्या १८ वर्षाचा आहे. आम्ही एकमेकांच्या संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते. आम्हाला चार महिन्यांची मुलगी देखील आहे’. या महिलेने जामिनासाठी अर्ज केला असून आज म्हणजे शुक्रवारी यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलावर बलात्कार; येमेनमध्ये देतात ‘ही’ भयानक शिक्षा

- Advertisement -

‘तरुणीने धमकी दिल्यामुळे तरुणीसोबत राहतो’

मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ‘गेल्यावर्षी तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत घरी आली. तिने माझ्या मुलाला धमकी दिली. त्यामुळे माझा मुलगा तिच्यासोबत निघून गेला आणि परत आलाच नाही. तरुणी दरवेळी आत्महत्येची धमकी देत असे त्यामुळे नाईलाजाने मुलाला तिच्यासोबत राहावे लागत आहे’. तर दूसरीकडे तरुणीने न्यायालयात सांगितले आहे की, या महिलेला दोन मुले आणि एक मुलगा आहे. त्यात मोठ्या मुलीचे वय २० वर्षे आणि लहान मुलीचे वय आठ वर्ष आहे. तर मग मुलाचे वय १७ वर्ष ८ महिने कसे असू शकते? असा सवाल तिने तिच्या वकिलांमार्फत केला आहे.


हेही वाचा – खंडणीसाठी चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -