वर्ल्ड हेरिटेज एलिफंटावरील भूमिपुत्रांवरच उपासमारीची वेळ

Mumbai
एलिफंटा

जागतिक दर्जाच्या एलिफंटा बेटावर आगरी बांधव मागील कित्येक वर्षांपासून छोटे-छोटे दुकाने थाटून समुद्रकिनार्‍यावर पारंपरिक व्यवसाय करत आहेत. त्या व्यवसायावरच त्यांचे कुटुंब चालत आहे. मात्र, महाराष्ट्र सागरी महामंडळकडून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची दुकाने नोटीस न देताच तोडण्यात आली आहेत. त्यामुळे व्यवसाय करणार्‍या सुमारे एक हजार नागरिकांवर उपासमारीची पाळी आली आहे.

एलिफंटा (घारापुरी ) बेटाची जगप्रसिद्ध बेट म्हणून ख्याती आहे. वर्ल्ड हेरिटेजमुळे या बेटावर जगभरातून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. घारापुरी बेट चहुबाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेले असल्याने येथे रोजगारासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक येथे येणार्‍या पर्यटकांवर अवलंबून कटलरी छोटी- छोटी दुकाने लावून, चने, फुटाणे, मका आदी व्यवसायांनी आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, खासगी पर्यटक व्यवसायितकांचा या ठिकाणावर डोळा असल्यामुळे सागरी महामंडळाच्य अधिकारी वर्गाला हाताशी घेऊन मोठे हॉटेल टाकण्याचा खासगी पर्यटक व्यावसायिकांचा मानस आहे. त्यामुळे मूळ निवासी नागरिकांनी देशोधडीला लागण्याची भिती दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे.

अधिकृत भाडेतत्वावर जागा मिळावी

सदरचा कटलरी व्यवसाय पारंपरिक पद्धतीने ग्रामस्थ करीत असून, करीत असलेल्या व्यवसायाच्या ठिकाणी अधिकृत भाडे तत्वावर जागा मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. आम्ही या मागणीसाठी मागील कित्येक वर्षांपासून सरकारी कार्यालय आणि जनप्रतिनिधींना निवेदन दिली. मात्र आमची मागणी पूर्ण होत नाही. यासंबंधी तक्रार करण्याकरिता एलिफंटा बेटावरील ५० पेक्षा जास्त दुकानदार महिलांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डावर धडक मोर्चा काढण्यात काढला होता.

आमचा एलिफंटा (घारापुरी)च्या विकास कामाला विरोध नाही. मात्र कित्येक वर्षांपासून इथले स्थानिक पर्यटकांवर अवलंबून छोटी- छोटी कटलरी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी.-बलीराम ठाकूर, सरपंच, घारापुरी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here