घरमुंबईघरगुती गॅस चोरी; कल्याणच्या भारत गॅस गोडाऊनवर पॊलिसांचा छापा

घरगुती गॅस चोरी; कल्याणच्या भारत गॅस गोडाऊनवर पॊलिसांचा छापा

Subscribe

घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून कमिर्शयल गॅसमध्येभरून चोरी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून कमिर्शयल गॅसमध्येभरून चोरी होत असल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी कल्याणच्या पोलिसांनी उघडकीस आणला असून या चोरटयांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पेालिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. रमाकांत पस्टे, रमेश गुरव, दिनेश शेरखाने या एजन्सीच्या दोन मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. एजन्सी चालक रोहित सूचक आणि उमेश बनसोडे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

…असा उघडकीस आला प्रकार

कल्याण पश्चिमेतील भानुनगर परिसरात भारत गॅसची कल्याण नावाची एक एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून कमर्शियल गॅसमध्ये भरून चोरी केली जाते, अशी माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एजन्सी वर छापा टाकत घरगुती गॅस सिलेंडरचे वजन करण्यात केले. त्यामधील प्रत्येक सिलेंडर मध्ये १ ते २ किलो गॅस कमी आढळून आला. गॅस चोरीचा हा प्रकार एजन्सीमध्ये सुरु असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. गॅस चोरीच्या प्रकारामुळे कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जात होती. ग्राहकांकडून पूर्ण गॅसचे पैसे घेतले जात होते. मात्र, त्या मोबदल्यात गॅस कमी दिला जात होता. एवढेच नाही तर एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस टाकताना मोठी दुर्घटना देखील घडू शकते याचा विचार देखील या गॅस चोरट्यांना नव्हता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून या चोरटयांना रंगेहात अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोटारसायकल व मोबाईल चोरी करणारा चोरटा जेरबंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -