घरमुंबईराजभवनातील ऐतिहासिक तोफांची जागा अखेर बदलली

राजभवनातील ऐतिहासिक तोफांची जागा अखेर बदलली

Subscribe

राजभवन येथे समुद्राच्या पायथ्याशी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या या दोन वजनदार तोफा दिसल्या होत्या. त्यानंतर त्या क्रेन्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या होत्या.

गेल्यावर्षी राजभवनच्या पायथ्याशी दुर्लक्षित अवस्थेत सापडलेल्या ब्रिटीशकालीन तोफांची जागा अखेर बदलण्यात आली. राजभवनातील हिरवळीवरून हलवून ‘जल विहार’ सभागृहासमोर दर्शनी भागात या तोफा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘जल विहार’ विभागात राज्यपालांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांना या तोफा पाहता येणार आहेत. राजभवन येथे समुद्राच्या पायथ्याशी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या या दोन वजनदार तोफा दिसल्या होत्या. त्यानंतर त्या क्रेन्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन

- Advertisement -

राजभवनाच्या पश्चिमेकडील पायथ्याजवळ होत्या तोफा

जवळजवळ ५ तासांच्या प्रयत्नानंतर प्रत्येकी २२ टन वजनाच्या या तोफा ३०० टन क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीने उचलून जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या. ‘जल विहार’ सभागृहात राज्यपाल विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत असतात. त्यामुळे या तोफा आता राज्यपालांना भेटायला येणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांना तसेच राजभवनाला भेट देणाऱ्या नागरिकांना पाहता येणार आहेत. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी या दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने राजभवनाच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून उचलून बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या जवळच असलेल्या हिरवळीवर तात्पुरत्या ठेवण्यात आल्या होत्या.

तोफांसाठी चौथऱ्यांची उभारणी

अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत पडल्या असल्यामुळे तोफा गंजून वाईट स्थितीत होत्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सुचनेनुसार तोफा जतन करण्यासाठी त्यांवर प्रक्रिया करण्यात आली तसेच गंजप्रतिबंधक मुलामा देण्यात आला. त्यानंतर तोफा ठेवण्यासाठी ‘जलविहार’ सभागृहाबाहेर दोन चौथरे तयार करण्यात आले. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे तोफा हलवून जलविहार सभागृहाबाहेर प्रस्थापित करण्यात आल्या. या तोफांची लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -