घरमुंबईअटलजींनी कधी पराभव झाला म्हणून राजीनामा दिला नाही - उद्धव ठाकरे

अटलजींनी कधी पराभव झाला म्हणून राजीनामा दिला नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

मुंबईत अटल स्मृती उद्यानाच्या उद्घटन प्रसंगी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर टीका केली.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. ‘निवडणुकीत जय-पराजय हा होतच असतो. त्यावेळी आमच्या पदरात देखील पराभव यायचा. पण तेव्हा कधी अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही’, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्ष टीका केली. बोरीवली येथे अटल स्मृती उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे?

‘जेव्हा शिवसेना-भाजपा युती झाली ही तेव्हा ती जिंकण्यासाठी झाली. पण तेव्हा पराभव होत होता. तेव्हा या नेत्यांनी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. आपल्या विचारांशी हे लोक प्रामाणिक राहिले. पराभव होतो म्हणून कोणी मैदान सोडत नाही. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचा देखील पराभव झाला. पण त्यांनी हार नाही मानली नाही, असे सांगत तेव्हा कुणी पराभव झाला म्हणून राजीनामा दिला नाही’, अशी टीकाच राहुल गांधी यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींसारखं साहस फार कमी लोकांकडे असतं – प्रियंका गांधी

‘आता विरोधकांना गदागदा हलवू’

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती गदा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला आणि देवेंद्र यांना तुम्ही आज गदा दिल्या. आता आम्ही विरोधकांना गदा गदा हलवू. मात्र कार्यकर्त्यांवर कुठलीही गदा येऊ देणार नाही.’ दरम्यान यावेळी त्यांनी इव्हीएमवर टीका करणाऱ्यांना देखील उत्तर दिलं. ‘आता आम्हाला मते मिळत आहेत, तर काही लोक ईव्हीएमवर टीका करत आहेत. मात्र हा ईव्हीएमचा घोळ नाही. तेव्हा पेरलेले विचार आहेत आणि त्यामुळे मते मिळत आहेत’, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -