घरमुंबई'फेस ऑफ युरोप अॅण्ड वर्ल्ड' स्पर्धेत उल्हासनगरच्या अक्षता टालेची निवड

‘फेस ऑफ युरोप अॅण्ड वर्ल्ड’ स्पर्धेत उल्हासनगरच्या अक्षता टालेची निवड

Subscribe

पुण्याच्या सिएरा या स्पर्धात्मक परीक्षा केंद्राद्वारे या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी देशातील शेकडो मुलींमधून उल्हासनगरच्या अक्षता टालेची निवड करण्यात आली.

जागतिक स्तरावरील ‘फेस ऑफ युरोप अॅण्ड द वर्ल्ड’ या स्पर्धेत भारतीय चेहरा म्हणून अक्षता टाले या तरुणीची निवड झाली आहे. तिच्या निवडीमुळे शहरात सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. पुण्याच्या सिएरा या स्पर्धात्मक परीक्षा केंद्राद्वारे या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी देशातील शेकडो मुलींमधून उल्हासनगरच्या अक्षता टालेची निवड करण्यात आली.

१ ते ७ नोव्हेंबर मध्ये पार पडणार स्पर्धा

१८ वर्षीय अक्षता ही नुकतीच सीएचएम विद्यालयातून उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत ९२ टक्के घेऊन उत्तीर्ण झाली आहे. महाविद्यालयीन दशेतच ती उत्कृष्ट निवेदिका व कथ्थक नर्तिका म्हणूनही लोकप्रिय आहे. सुंदर आणि प्रभावी व्यक्तिमत्व, शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्वाकांक्षा, सामान्यज्ञान, वैशिष्ट्यगुण, भारतातील संस्कृती, लोककला यांचा अभ्यास या निकषांवर आधारित अक्षताची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. या वर्षी १ ते ७ नोव्हेंबर मध्ये इंग्लंड, पॅरीस, फ्रान्स या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जोगेश्‍वरीत लवकरच उभारणार भव्य राष्ट्रध्वज

अक्षतावर अभिनंदनाचा वर्षाव

अक्षता ही सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हाअध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिका नगरसेवक प्रमोद टाले यांची कन्या आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अक्षता उल्हासनगरची भूषण ठरली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -