घरमुंबईडोंबिवलीतील आगरी मतं सेना-भाजपकडे जातील का?

डोंबिवलीतील आगरी मतं सेना-भाजपकडे जातील का?

Subscribe

आगरी मतं मिळवण्यासाठी डोबिंवलीत सेना-भाजपने आगरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांना मतदान करावे असे अवाहन करण्यात आले.

आगरी समाजाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकीकडे आगरी कोळी भूमिपुत्र एकत्रित होत असतानाच, दुसरीकडे सेना भाजपतील आगरी समाजाचे नेते एकवटले आहेत. त्यासाठी रविवारी आगरी समाजाचा मेळावा पार पडला. आगरी समाजाची सर्व ताकद महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी करावी असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी यावेळी केले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंब्र्याच्या डोंगरापासून ते मलंगगडाच्या पायथ्यापर्यंत आगरी समाजाची मोठी ताकद आहे. गेल्यावेळी शिंदे हे नविन होते. मात्र जात्यावर बसला की माणूस दळायला लागतो आणि त्याला ओवी सुचतात असे सांगत त्यांनी डॉ. शिंदे यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

- Advertisement -

आपल्यापेक्षा छोट्या असणाऱ्या समाजाचेही मेळावे होतात. आपण तर इथले भूमिपुत्र आहोत. आपल्या विकासासाठी आपण एकत्र यायला हवं. या सुप्त इच्छेतूनच हा समाजाचा मेळावा आयोजित केला असून आपल्या समाजाच्या विकासासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले. आपल्या समाजाचे भवितव्य सुधारायचे असेल तर एक नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहिले पाहीजे. आपली शक्ती ओळखा आणि उगाच कोणाच्याही मागे लागू नका असेही म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे, बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील आदीनी केवळ शिवसेना पक्षामुळे आज आपण इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचल्याचे सांगितले. यावेळी आगरी समाजाच्या मेळाव्याला शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रकाश पाटील, डोंबिवली शहर शिवसेना प्रमूख राजेश मोरे, आमदार सुभाष भोईर, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक नगरसवेक आणि महिला लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -