घरमुंबईवसईमधून महिला विशेष लोकल पुन्हा सुरू होणार

वसईमधून महिला विशेष लोकल पुन्हा सुरू होणार

Subscribe

‘महानगर’च्या वृत्ताची पश्चिम रेल्वेकडून दखल

पश्चिम रेल्वेने वसई महिला विशेष लोकल बंद करून ती विरारपासून सुरु केली होती. त्यामुळे विरारच्या महिलांना या निर्णयाचा फायदा झाला, परंतु वसईच्या महिला प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली होती. त्यामुळे वसईच्या महिला पुन्हा वसई महिला विशेष लोकल सुरु करण्याची मागणी करू लागल्या. याबाबत दैनिक ‘आपलं महानगर’ने ‘विरार में खुशी तो वसई में गम’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा वसई येथून महिला विशेष लोकल सुरु करण्याची मागणी केली. त्यावर पश्चिम रेल्वेने सकारात्मक विचार करत असल्याचे उत्तर आमदार ठाकूर यांनी दिले.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबरपासून लोकल गाड्यांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार वसईपासून सुटणारी महिला स्पेशल लोकल रद्द करून ती विरारपासून सुरु केली. त्यामुळे विरारच्या महिलांना या स्पेशल लोकलचा फायदा झाला, मात्र पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे वसईच्या महिलांना गर्दीचा मनस्ताप वाढला होता. त्यामुळे या पश्चिम रेल्वेच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त करत वसई महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी पश्चिम रेल्वेला करण्यात आली होती. मात्र रेल्वे यावर लक्ष देत नव्हते. त्यानंतर या महिलांनी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. महिला प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार क्षितिज ठाकूर यांनी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्री यांना पत्रव्यवहार केला. सोबत दैनिक आपलं महानगरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताचे कात्रण जोडले. त्यामुळे पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांच्या समस्याची दखल घेत लवकरच पश्चिम रेल्वे वसईच्या महिलांच्या समस्या समजून महिला विशेष लोकलसाठी निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.

- Advertisement -

वसई महिला विशेष लोकल बंद केल्यामुळे वसईच्या महिलांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सहकार्याने पश्चिम रेल्वेला विनंती केली होती कि, वसई महिला विशेष लोकल पुन्हा सुरु करण्यात यावी. त्यावर पश्चिम रेल्वे सकारात्मक असून लवकरच वसई महिला विशेष लोकलवर निर्णय घेणार आहेत.  – अ‍ॅड. मृदुला खेडेकर, वसई येथील लोकल प्रवाशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -