Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर पालघर पतसंस्थेच्या महिला संचालकाची भरवस्तीत असणाऱ्या कार्यालयात हत्या

पतसंस्थेच्या महिला संचालकाची भरवस्तीत असणाऱ्या कार्यालयात हत्या

या घटनेने शहारात एकच खळबळ

Related Story

- Advertisement -

कोरोनादरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर बरेच लोक बेरोजगार झालेत. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसतंय. दिवसेंदिवस हत्या आणि गुन्हेगारी वाढली असताना पालघर शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघरमध्ये असणाऱ्या एका पंतसंस्थेच्या महिला संचालकाची भरवस्तीत असलेल्या कार्यालयात शनिवारी हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून साधारण ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

असा घडला प्रकार

पालघर शहरातील रेल्वे स्थानकाजवळील शुक्ला कंपाऊंड या ठिकाणी असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अष्टविनायक पंतसंस्थेचे कार्यालय आहे. या पतसंस्थेच्या संचालिका वयवर्ष ५७ असणाऱ्या साधना रामकृष्ण चौधरी असून त्या शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयात हिशेबाचे काम करत होत्या, त्यानंतर शनिवारी घरी उशिरापर्यंत त्या घरी पोहोचल्या नसल्याने कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

- Advertisement -

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी पतसंस्थेच्या समोरच्या फ्लॅटमध्ये चालणाऱ्या ट्यूशन क्लासच्या संचालक त्रिवेदी यांना फोन केला असता, त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी साधना चौधरी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आणि कुटुंबीयांना याची माहिती दिली. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, साधना चौधरी यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या शस्त्राच्या वारामुळे त्यांचा जागीत मृत्यू झाला. याप्रकरणी चार-पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. साधना यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

- Advertisement -