आज मुंबईत कोरोना लस दाखल झाली आहे. पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ येथून विशेष वाहनाद्वारे मुंबईत आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास लसीचा साठा मुंबईत दाखल झाला. कोरोना लसीचे १ लाख ३९ हजार डोस आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या परळ येथील कोल्ड स्टोरेजमध्ये या लसींच्या डोसांची साठवणूक करण्यात आली आहे. परळच्या या कोल्ड स्टोरेजमध्ये दहा लाख कोरोना लसीचे डोस साठवता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
- Advertisement -
पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमधून कोरोना लसीचे डोस देशभरातील राज्यांमध्ये पाठविण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईत कोरोना लस दाखल झाली आहे.
पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ येथून विशेष वाहनाद्वारे मुंबईत आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास लसीचा साठा मुंबईत दाखल झाला.
कोरोना लसीचे १ लाख ३९ हजार डोस आज मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईच्या परळ येथील कोल्ड स्टोरेजमध्ये या लसींच्या डोसांची साठवणूक करण्यात आली आहे.
पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ येथून विशेष वाहनाद्वारे मुंबईत आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास लसीचा साठा मुंबईत दाखल झाला.
मुंबईच्या कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने कोरोना लसीची साठवणूक परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये करण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागाने सांगितले आहे.