घरIPL 2020IND vs AUS : विराट कोहलीसोबत पंगा नकोच; स्टिव्ह वॉची ऑस्ट्रेलियाला ताकीद 

IND vs AUS : विराट कोहलीसोबत पंगा नकोच; स्टिव्ह वॉची ऑस्ट्रेलियाला ताकीद 

Subscribe

कोहलीविरुद्ध स्लेजिंग करणे टाळा,अशी ताकीद स्टिव्ह वॉने ऑस्ट्रेलियन संघाला दिली आहे.  

आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध स्लेजिंग करणे टाळा, कारण याचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही, अशी ताकीद ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉने ऑस्ट्रेलियन संघाला दिली आहे. भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दोन बलाढ्य संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे १७ डिसेंबरपासून खेळला जाईल. त्यानंतरचे कसोटी सामने मेलबर्न (२६-३० डिसेंबर), सिडनी (७-११ जानेवारी २०२१) आणि ब्रिस्बन (१५-१९ जानेवारी २०२१) येथे होणार आहेत.

स्लेजिंगचा विराट कोहलीवर काहीच परिणाम होणार नाही. महान खेळाडूंविरुद्ध स्लेजिंग करण्याचा फायदा नसतो. त्यांच्याशी पंगा घेणे तुम्ही टाळले पाहिजे. कोहलीसारख्या खेळाडूला स्लेज केल्यावर त्याच्यातील जिद्द आणखी वाढते आणि तो अधिक मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोहली फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी शांत राहिलेलेच बरे असते, असे वॉने सांगितले.

- Advertisement -

मागील वर्षीच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ खेळला नव्हता. २०१८ मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमधील बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यंदा मात्र स्मिथ खेळणार असून त्याच्या आणि कोहलीमधील द्वंद्वावर वॉची नजर असणार आहे. तसेच वॉ पुढे म्हणाला, मागील वर्षी स्मिथ खेळला नव्हता. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा स्मिथने कोहलीपेक्षा चांगली कामगिरी केली होती. स्मिथने तीन शतके झळकावली होती, तर कोहली एकही शतक करू शकला नव्हता. त्यामुळे यंदा कोहली स्मिथपेक्षा जास्त धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -