घरक्रीडाBCCI निवड समितीसाठी ही चार नावं शॉर्टलिस्ट!

BCCI निवड समितीसाठी ही चार नावं शॉर्टलिस्ट!

Subscribe

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद आणि समिती सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने बीसीसीआयने या पदासाठी नवे अर्ज मागविले होते. अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. यातून बीसीसीआयने चार सीनिअर खेळाडूंची नाव शॉर्टलिस्ट केली आहेत.

बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत असते. या समितीने निवड समिती प्रमुख पदासाठी चार नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद आणि समिती सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने बीसीसीआयने या पदासाठी नवे अर्ज मागविले होते. अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. यातून बीसीसीआयच्या चार सीनिअर खेळाडूंची नाव शॉर्टलिस्ट केली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवड समितीच्या नवीन प्रमुखांची निवड होणार असून, या चारही उमेदवारांची मुलाखत मात्र अद्याप झालेली नाही. बीसीसीआयने शॉर्टलिस्ट केलेल्यांमध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर, वेंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चौहान यांचा समावेश आहे. क्रिकेट सल्लागार समिती या चारही उमेदवारांची मुलाखत घेणार आहे.

बीसीसीआयने निवडण्यात आलेलेल्या या चारही उमेदवारांची मुलाखत पुढील १० दिवसांत होणार असून, नव्या निवड समिती प्रमुखाचं नाव फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जाहीर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडल्या जाणाऱ्या प्रमुखावर आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीची जबाबदारी असणार आहे. आफ्रिकेविरूद्धची मालिका ही १२ मार्चपासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

बीसीसीआयला पाठवलेला मेल गायब?

बीसीसीआयसाठी निवडण्यात आलेल्या या चार उमेद्वारांपैकी एक असलेले लक्ष्मण शिवरामकृष्णन हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियाच्या निवड समितीच्या प्रमुख पदासाठी अर्ज केलेला मेल अचानक गायब झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरली होती.
बीसीसीआयच्या इनबॉक्समधून लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी पाठवलेल्या अर्जाचा मेल अचानक गायब झाला होता. यातून अनेकांनी आपली मतं मांडली. हा मेल कदाचीत डिलीट करण्यात आला असावा असे म्हटले गेले. मात्र, अर्जाची मुदत संपायच्या ४८ तास आधी मेल पाठवला असल्याचे शिवरामकृष्णन यांनी सांगितले आहे. तसेच बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर शिवरामकृष्णन यांचा मेल आल्याचे स्पष्ट दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -