घरक्रीडायंदा महिला क्रिकेटर्सची देखील IPL स्पर्धा होणार

यंदा महिला क्रिकेटर्सची देखील IPL स्पर्धा होणार

Subscribe

कोरोनामुळे रखडलेली यंदाची IPL स्पर्धा अखेर सप्टेंबर महिन्यात युएइमध्ये खेळवण्यात येणार असल्याची घोषणा यापुर्वीच करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला क्रिकेटर्सची आयपीएल स्पर्धा देखील यावेळी भरविण्यात येणार आहे. याआधी दोनवेळा महिलांची आयपीएल खेळवण्यात आली होती. यावेळी पुरुषांची आयपीएल स्पर्धा खेळण्याचे निश्चित झाल्यानंतर महिलांची स्पर्धा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

पुरुष खेळाडूंच्या IPL ची घोषणा केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात येत होती. महिला क्रिकेटला उभारी देण्याचा कोणताही प्रयत्न बोर्डाकडून होत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर IPL च्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होण्याआधीच महिलांची IPL होणार असल्याची बातमी बाहेर आली आहे. “महिला क्रिकेटचे सशक्तीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. आयपीएद्वारे ते प्रयत्न केले जात आहेतच, त्याशिवाय भारतीय संघासाठी देखील आमच्याकडे काही योजना आहेत.”, अशी माहिती सौरव गांगुली यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

- Advertisement -

“सध्या कोरोनामुळे सर्वकाही बंद आहे. एनसीए (National Cricket Acadamy) देखील बंद आहे. आम्ही आमच्या खेळाडूंना उगाच क्रिकेट खेळण्यास उतरवू शकत नाही. पुरुष असो किंवा स्त्रिया सर्वांना आरोग्याचा धोका समान आहे. मात्र या वातावरणात देखील आम्ही महिलांसाठी काहीतरी करु, अशी ग्वाही सौरव गांगुली यांनी दिली. आज IPLच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून त्यामध्ये महिलांच्या आयपीएल स्पर्धेची दिनांक ठरण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा १ ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -