घरIPL 2020CSK vs SRH Live Update : हैदराबादचा चेन्नईवर ७ धावांनी विजय

CSK vs SRH Live Update : हैदराबादचा चेन्नईवर ७ धावांनी विजय

Subscribe

आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्ध हैदराबाद असा सामना होत आहे.

सनरायझर्स हैदराबादने चेन्नईला ७ धावांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला आहे. हैद्राबादच्या १६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत ५ गड्यांच्या मोदल्यात १५७ धावा केल्या. कर्णधार धोनीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हैदराबादचे गोलंदाज वरचढ ठरले. या पराभवामुळे चेन्नईची पराभवाची मालिका सुरुच आहे. सविस्तर वाचा


पॉवर-प्लेच्या ६ षटकांत चेन्नईची ३ बाद ३६ अशी अवस्था होती. शेन वॉटसन (१), अंबाती रायडू (८) आणि फॅफ डू प्लेसिस (२२) हे झटपट माघारी परतले.

- Advertisement -

१६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची अडखळती सुरुवात झाली.


हैदराबादने २० षटकांत ५ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. गर्गने नाबाद ५१ धावांची खेळी केली.

- Advertisement -

प्रियम गर्गचे २३ चेंडूत अर्धशतक. आयपीएल स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक ठरले.


अभिषेक शर्माला ३१ धावांवर दीपक चहरने बाद केले.


हैदराबादची ४ बाद ६९ अशी अवस्था होती. त्यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्माने हैदराबादला सावरले.


वॉर्नर (२८) आणि केन विल्यमसन (९) सलग दोन चेंडूंवर बाद झाले. वॉर्नरला पियुष चावलाने बाद केले. तर विल्यमसन धावचीत झाला.


चांगल्या सुरुवातीनंतर मनीष पांडेला (२९) शार्दूल ठाकूरने बाद केले.


पॉवर-प्लेच्या ६ षटकांनंतर हैदराबादची १ बाद ४२ अशी धावसंख्या होती.


बेअरस्टो लवकर बाद झाल्यानंतर मनीष पांडे आणि कर्णधार डेविड वॉर्नर यांनी मिळून हैदराबादला सावरले.


हैदराबादच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला दीपक चहरने खाते न उघडता माघारी पाठवले.


हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.


हे दोन्ही संघ सध्या गुणतक्त्यात तळाला असून त्यांना तीन पैकी केवळ एक सामना जिंकण्यात यश आले आहे.


आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -