घरताज्या घडामोडीVideo: अन मुंबई पोलिसांनी अखेरच्या क्षणी जीवावर खेळून आत्महत्या करणाऱ्या मुलीला वाचवलं

Video: अन मुंबई पोलिसांनी अखेरच्या क्षणी जीवावर खेळून आत्महत्या करणाऱ्या मुलीला वाचवलं

Subscribe

मुंबई पोलिसांची किर्ती जागतिक स्तरावर का पोहोचलेली आहे? याचे अनेक उदाहरणे हे जिगरबाज पोलीस रोजच्या रोज देत असतात. कोरोना विरोधात लढाई देण्यासाठी २४ तास घराबाहेर राहून, जीवाशी खेळून पोलीस आपली ड्युची निभावत आहेतच. त्याशिवाय आत्महत्येच्या विचारात असलेल्या लोकांना देखील पोलीस वेळेवर वाचवत आहेत. आज अंधेरी येतील तिरुपती बालाजी इमारतीच्या गच्चीवर आत्महत्या करण्यासाठी चढलेल्या एका तरुणीला मुंबई पोलिसांच्या टीमने मोठ्या शिताफिने वाचवले.

कोरोना नंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक नैराश्यात आत्महत्या करत आहते. त्यामुळे पोलिसांसमोर एक वेगळेच संकट उभे राहिले आहे. आज दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या वेस्टर्न कंट्रोल रुमला एक फोन आला. त्यातील माहितीनुसार अंधेरीच्या तिरुपती बालाजी इमारतीच्या गच्चीवरील टाकीवर एक तरुणी चढली असून ती आत्महत्येच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. कॉल आल्यावर लगेचच अंधेरी मोबाईल पथकातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, बीट मार्शल शिवाजी पावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तिला वाचवणे सोपे नसते. त्याचे योग्य समुपदेशन करुन तो टोकाचे पाऊल उचलणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. पोलीसांनी सहा मजले वर चढून गच्ची गाठली आणि तरुणीला विश्वासात घेऊन तिला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर इतर सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून तरुणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशळ मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

तरुणीला वाचविल्यानंतर तिच्याकडे अधीक चौकशी केली असता तिने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीची समजूत काढून कुटुंबीयांकडे तिचा ताबा देण्यात आला, अशी माहिती अंधेरी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -