घरक्रीडाया फुटबॉलपटूने लावला लग्नांच्या अफवांवर पूर्णविराम

या फुटबॉलपटूने लावला लग्नांच्या अफवांवर पूर्णविराम

Subscribe

माजी ब्राझील/ब्रार्सिलोनाचा फुटबॉलपटू ‘रोनाल्डिन्‍हो’च्या लग्नाबाबतीत काल पासून उठणाऱ्या अफवांना त्यानेच पूर्णविराम लावला आहे. रोनाल्डिन्‍हो एकाचवेळी दोघींशी लग्न करणार असा दावा इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. मात्र अखेर रोनाल्डिन्हो स्वतः माध्यमांसमोर येऊन ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. स्पोर्ट टिव्ही या वृत्तवाहिनीशी बोलतांना त्याने हा खुलासा केला.

प्रसारित झालेली अफवा
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारलेला हा फुटबॉलपटू एकाच वेळी त्याच्या दोन्ही प्रेयसींशी विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं. आपल्या प्रिसीलिया कोएल्हो (Priscilla Coelho) आणि बिट्रीझ सोझा (Beatriz Souza) या दोन्ही प्रेयसींसोबत सहजीवनाची शपथ त्याने घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. इंस्ट्राग्रामवरील फोटो वरुन या तीघांचे लग्न होणार असा समज झाला होता. डिसेंबर महिन्यापासून या तीघांनी एकत्र रहाण्याचा निर्णय घेतला होता असून थोड्या दिवसात एकाच दिवशी यांचे लग्न होणार असल्याचे सांगितल्या जात होते. या लग्नाला त्याच्या बहिणीकडून विरोध असून तिने लग्नास येणार नसल्याचे सांगितले अशा प्रकारच्या बातम्या या समोर येत होत्या. आपल्या दोन्ही प्रेयसींना हा फुटबॉलपटू १,५०० पाऊंड (१.३६ लाख रुपये) पॉकेटमनीच्या स्वरुपात देत असल्याचीही चर्चा होती.

- Advertisement -

 

- Advertisement -

जाणून घ्या कोण आहे रोनाल्डिन्‍हो
रोनाल्डिन्हो हा जगातील महाग फुटबॉलपटू होता. प्रसिद्ध असल्यामुळे त्याचे अनेक किस्से हे माध्यमांमुळे चर्चेत होते. फीफा वर्ल्डकपमध्ये ही त्याने भाग घेतला होता. आतापर्यंत त्याने आपल्या देशासाठी ९७ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ३३ गोल केलेत. २००२ साली झालेल्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये ब्राझीलच्या संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. १९९८ मध्ये ग्रेमीओ फुटबॉल क्लबच्यावतीने खेळून त्याने आपल्या फुटबॉल करीअरची सुरुवात केली होती. आपण कधीही लग्न न करणार असल्याचे वक्तव्य त्याने केले असल्याने त्याच्या लग्नाची अफवा ही चर्चेत आली.

” या अफवांमुळे सर्व जग मला फोन करत आहे. सध्यातरी मी कोणाशी लग्न करत नाही. हे सर्वात मोठं खोट आहे”, – फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -