घरIPL 2020IPL 2020 : पंजाबचा विजय हुकला; कोलकाता दोन धावांनी विजयी 

IPL 2020 : पंजाबचा विजय हुकला; कोलकाता दोन धावांनी विजयी 

Subscribe

पंजाबचा हा सात सामन्यांत सहावा पराभव ठरला.

लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल या सलामीवीरांनी अर्धशतके करूनही किंग्स इलेव्हन पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना अवघ्या दोन धावांनी गमावला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना पंजाबला अखेरच्या चेंडूवर सात धावांची आवश्यकता होती. परंतु, सुनील नरीनच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलला चौकारच लगावता आल्याने पंजाबला विजयासाठी दोन धावा कमी पडल्या. पंजाबचा हा सात सामन्यांत सहावा पराभव ठरला.

दिनेश कार्तिकचे अर्धशतक 

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. राहुल त्रिपाठी (४) आणि नितीश राणा (२) हे फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. मात्र, शुभमन गिल आणि इयॉन मॉर्गन यांनी कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. मात्र, मॉर्गनला (२४) रवी बिष्णोईने बाद करत ही जोडी फोडली. गिलने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५७ धावांवर धावचीत झाला. यानंतर अखेरच्या षटकांत कर्णधार दिनेश कार्तिकने केलेल्या (२९ चेंडूत ५८) फटकेबाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

राहुल, मयांकची शतकी सलामी 

याचा पाठलाग करताना कर्णधार राहुल आणि मयांक या सलामीवीरांनी पंजाबच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी १४.२ षटकांत ११५ धावांची सलामी दिली. अगरवालने ३३, तर राहुलने ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, मयांकला ५६ धावांवर बाद करत प्रसिध कृष्णाने पंजाबला पहिला धक्का दिला. निकोलस पूरन (१६) आणि प्रभसिमरन सिंग (४) हे झटपट बाद झाले. राहुलने एक बाजू लावून धरत पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ७४ धावांवर त्याचा प्रसिध कृष्णाने त्रिफळा उडवला. पंजाबला अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी १४ धावांची आवश्यकता होती. मात्र, नरीनच्या या षटकात पंजाबला ११ धावाच करता आल्याने त्यांचा पराभव झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -