Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : पावसानंतर कांगारुंची जोरदार बॅटिंग; पुकोवस्की, लबूशेनची अर्धशतके

IND vs AUS : पावसानंतर कांगारुंची जोरदार बॅटिंग; पुकोवस्की, लबूशेनची अर्धशतके

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची २ बाद १६६ अशी धावसंख्या होती.

Related Story

- Advertisement -

सिडनी क्रिकेट ग्राऊंडची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची २ बाद १६६ अशी धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच पावसानेही जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे पहिल्या दिवशी केवळ ५५ षटकांचा खेळ होऊ शकला. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. त्याने कसोटीत पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीला माघारी पाठवले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणाऱ्या सलामीवीर डेविड वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले. मात्र, त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मोहम्मद सिराजने वॉर्नरला ५ धावांवर चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केले. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. त्यामुळे पहिल्या सत्रात केवळ ७.१ षटकेच टाकली गेली.

- Advertisement -

मैदानावर परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. पदार्पण करणारा पुकोवस्की आणि मार्नस लबूशेनने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पुकोवस्कीने ९७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला ६२ धावांवर सैनीने पायचीत पकडत ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला. लबूशेनने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. त्याला स्टिव्ह स्मिथची उत्तम साथ लाभली. या दोघांनी ६० धावांची अभेद्य भागीदारी रचल्याने ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर २ बाद १६६ अशी धावसंख्या होती. लबूशेन ६७ आणि स्मिथ ३१ धावांवर नाबाद होता.

- Advertisement -