घरक्रीडाधोनीची वनडेतून निवृत्ती? रवी शास्त्रींनी दिले संकेत

धोनीची वनडेतून निवृत्ती? रवी शास्त्रींनी दिले संकेत

Subscribe

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. धोनीने आपला अखेरचा सामना मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर तो स्थानिक क्रिकेटमध्येही खेळलेला नाही. मात्र, त्याने काही दिवसांपूर्वीच पुन्हा सरावाला सुरुवात केल्याने आणि युवा रिषभ पंतला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने, धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, धोनी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकेल, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले.

मी धोनीसोबत चर्चा केली आहे. त्याने काही वर्षांपूर्वी कसोटी कारकीर्द संपवली. आता तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकेल. त्याने खूप वर्षे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तो आता वयाच्या ज्या टप्प्यावर आहे, ते लक्षात घेता त्याला केवळ टी-२० क्रिकेट खेळायला आवडेल. तो लवकरच पुन्हा सामने खेळण्यास सुरुवात करेल, कारण त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. त्याने जर या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तर कदाचित त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

धोनीची जागा घेऊ शकणार नाही- हार्दिक

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो आता संघात नसल्याने फिनिशरची भूमिका इतर खेळाडूंना पार पाडावी लागत आहे. या खेळाडूंत हार्दिक पांड्याचाही सामावेश आहे. मात्र, मी कधीही धोनीची जागा घेऊ शकणार नाही, असे मत हार्दिक पांड्याने व्यक्त केले. तसेच तो पुढे म्हणाला, मी फिनिशरची भूमिका पार पडण्यास मी उत्सुक आहे. संघासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -