घरक्रीडाMI vs KKR: कोकणचो झील १ रन करुन बाद झालो

MI vs KKR: कोकणचो झील १ रन करुन बाद झालो

Subscribe

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात आज कोलकाताकडून कोकणचा सावंतवाडीचा निखिल शंकर नाईक खेळला. मात्र, त्याला या सामन्यात छाप पाडता आली नाही. निखिल केवळ एक धाव करुन तंबुत परतला. त्यामुळे निखिलच्या खेळीने कोकणकर आज निराश झाले आहेत.

निखलने याआधी किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. यंदा मात्र तो कोलकाता संघाकडून मैदानात उतरला. २०१६ मध्ये निखिलला पंजाब संघाने २० लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेतलं होतं, मात्र त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. २०१७-१८ मध्ये कोणत्याही संघाने निखिलला खरेदी केलेलं नाही. मात्र २०१९ मध्ये पर्यायी विकेटकीपर म्हणून निखिलला कोलकाता संघाने विकत घेतलं.

- Advertisement -

निखिलला लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याने त्याने टेनिस क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सावंतवाडी सारख्या ठिकाणी निखिलने स्पर्धा गाजवल्या आहेत आक्रमक फलंदाजीमुळे १५ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. क्रिकेटमध्ये कारकीर्दीची सुरुवात केल्या नंतर २०१० मध्ये त्याच्या आईचं पक्षघातामुळे निधन झालं. या एका घटनेने निखिल खचून गेला. मात्र त्याला त्याच्या वडिलांनी धीर दिला. यानंतर २०१४ मध्ये निखिलची विजय हजारे ट्रॉफीसाठी निवड झाली. या स्पर्धेत त्याने 4 सामन्यात २३४ धावा केल्या होत्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -