घरक्रीडावन डे ऑर टेस्ट, कोहली इज द बेस्ट !

वन डे ऑर टेस्ट, कोहली इज द बेस्ट !

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीला जणू विक्रम करण्याची सवयच लागली आहे. मंगळवारी त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोहलीला २०१८ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. त्याचप्रमाणे त्याला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू आणि सर्वोत्तम कसोटी खेळाडूचाही पुरस्कार मिळाला. त्यामुळे एकाच वर्षी हे तीन मानाचे पुरस्कार मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीने २०१८ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून खेळलेल्या ३७ सामन्यांच्या ४७ डावांत ६८.३७ च्या सरासरीने २७३५ धावा केल्या. यात ११ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळे त्याने सलग दुसर्‍यांदा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला मिळणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार मिळवला.

तसेच, कोहलीला सलग दुसर्‍यांदा सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. विराटने २०१८ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३३.५५ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या. २०१८ मध्येच तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १० हजार धावा करणारा खेळाडूही ठरला होता. तर,१३ कसोटी सामन्यांच्या २४ डावांत ५५.०८ च्या सरासरीने ५ शतकांसह १३२२ धावा करणारा कोहलीच २०१८ चा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला. त्याचीच आयसीसीच्या सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.

- Advertisement -

त्याच्यासोबत आयसीसीच्या कसोटी संघात रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांची तर एकदिवसीय संघात रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि बुमराह यांची निवड झाली. युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला २०१८ वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

आयसीसीचा वन डे संघ – रोहित शर्मा (भारत), जॉनी बेअरस्टोव (इंग्लंड), विराट कोहली (भारत) (कर्णधार), जो रूट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जॉस बटलर (इंग्लंड) (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्तफिजूर रहमान (बांगलादेश), राशिद खान (अफगाणिस्तान), कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमराह (भारत)

- Advertisement -

आयसीसीचा टेस्ट संघ – टॉम लेथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत) (कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), रिषभ पंत (भारत), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), कागिसो रबाडा (द.आफ्रिका), नेथन लायन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -