घरक्रीडाVIDEO : 'कॅप्टन कूल' धोनी वळला शेतीकडे!

VIDEO : ‘कॅप्टन कूल’ धोनी वळला शेतीकडे!

Subscribe

कॅप्टन कूल' धोनी सध्या शेतीकरत असून याकरता ट्रॅक्टर देखील शिकत आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्तम कर्णधारमधील एक आहे. दरम्यान, धोनी हा सध्या चांगलाच चर्चेत आला असून सध्या महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ‘कॅप्टन कूल’ धोनी सध्या स्वत:च्या फार्महाऊसमध्ये शेती करताना दिसत आहे.  विशेष म्हणजे याकरता धोनीने ट्रॅक्टर देखील चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या क्रिकेट बंद असल्याने धोनीने लॉकडाऊनची संधी साधत शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

काय आहे या व्हिडीओत?

चेन्नई सुपर किंग धोनीच्या व्हिडीओमध्ये सध्या धोनी हा शेती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे धोनी फक्त शेती करत नाही तर चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडीओवर सीएसकेने एक फनी कॅप्शन लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘धोनी आपल्या नवीन पशूवर बसून राजाला भेटायला निघाला आहे’. याचा अर्थ असा होतो की, ‘कितीही गंभीर परिस्थिती असली तरी देखील धोनी संघर्ष करुन यशस्वी होतोच’.

धोनी शिकला ट्रॅक्टर चालवायला

‘कॅप्टन कूल’ धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत असून त्या ट्रॅक्टरमध्ये त्याच्यासोबत एक व्यक्ती देखील आहे. जी धोनीला ट्रॅक्टर चालवण्यासाठी मदत करत आहे.

- Advertisement -

धोनी प्रत्येक फिल्डमध्ये नवीन करतो

धोनीच्या एका चाहत्यांनी कमेंट दिली आहे की, ‘धोनी ज्या फिल्डमध्ये जातो तिथे नवीन काही तरी करत असतो’.

फार्महाऊसवर लावण्यात आले टरबूज आणि पपई

धोनीने काही दिवसांपूर्वी स्वत:च्या फार्महाऊसवर टरबूज आणि पपईची देखील शेती केली होती. त्यावेळी त्यांनी देवाची पुजा करुन त्याच्या सेंद्रीय शेतीला सुरुवात केली होती. त्यावेळी देखील त्यांनी आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.


हेही वाचा – भारतीय क्रिकेटपटूंचे सराव शिबीर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -