घरक्रीडापाकिस्तानने खातं उघडलं; १४ धावांनी इंग्लंडला आडवं पाडलं

पाकिस्तानने खातं उघडलं; १४ धावांनी इंग्लंडला आडवं पाडलं

Subscribe

ट्रेंट ब्रिजचे मैदान हे फलंदाजांसाठी पर्वनी मानले जाणारे मैदान आहे. या मैदानावर इग्लंडने सर्वाधिक धावा केल्याची नोंद आहे. आज या मैदानाचा फायदा पाकिस्तानला देखील झाला आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अगदी अटीतटीचा सामना खेळला गेला. परंतु, सुरुवातीचे फलंदाज लवकर तंबूत परतल्याने इंग्लंडच्या पदरात निराशा पडली. पाकिस्तानने अवघ्या १४ धावांनी सामना जिंकला. इंग्लंडकडून बटलर आणि रुट यांनी शतके झळकावलीत. परंतु, तरीही ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

विश्र्वचषक स्पर्धेचा सहावा सामना इग्लंड आणि पाकिस्तान या दोन मात्तब्बर संघांमध्ये खेळला गेला. ट्रेंट ब्रिजच्या मैदानात हा सामना रंगला. हे मैदान म्हणजे फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या मैदानाचा पुरेपुर फायदा पाकिस्तानने घेतला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंगलंडचा हाच निर्णय फसला. कारण पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. त्यामुळे ५० षटकांत पाकिस्तानने तब्बल ३४८ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर इमाम-उल-हक आणि फखर झमनने ८२ धावांची भागिदारी केली. परंतु, फखर झमन स्टमिंग बाद झाला. त्याने ४० चेंडूत ३६ धावा केल्या. यानंतर इमाम झेलबाद झाला. त्याने ५८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी डाव सावरला. दोघांनी ८८ धावांची भागीदारी केली. परंतु, उंच फटका मारण्याच्या नादात आझम झेलबाद झाला. त्याने ६६ चेंडूत ६३ धावा केल्या. त्यानंतर हाफीजही बाद झाला. त्याने ६२ चेंडूत ८४ धावा केल्या. त्यानंतर सर्फराज अहमदने जोरदार अर्धशतक झळकवत पाकिस्तानच्या धावांचा आकडा ३०० पार केला. परंतु, त्यानंतर तो झेलबाद झाला. अखेर २० षटकांत ८ बाद ३४८ धावा पाकिस्तानने केल्या.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -