घरक्रीडाप्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या पीटीकेएस कनेक्ट मासिकाचे प्रकाशन

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या पीटीकेएस कनेक्ट मासिकाचे प्रकाशन

Subscribe

विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या पीटीकेएस कनेक्ट मासिकाचे प्रकाशन नुकतेच संकुलातील कलामंदिर सभागृहात पार पडले. शिवजयंतीचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रकाशन सोहळ्याला संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, कोषाध्यक्ष डॉ. पुष्पा रमेश प्रभू , लीना प्रभू, मकरंद एकरकर, आपलं महानगरचे संपादक संजय सावंत आणि मुख्य कार्याधिकारी प्रीतम केसकर उपस्थित होते.

- Advertisement -

माजी महापौर आणि माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या दूरदृष्टीतून साकारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात खेळाडूंना सर्वोत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, राष्ट्रीयसह आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करण्याचे काम हे संकुल गेली २१ वर्षे करत आहे. संकुलाची माहिती सर्वदूर पसरावी आणि अधिकाधिक लोकांनी संकुलातील सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी पीटीकेएस कनेक्ट’ नावाचे मासिक काढण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -