दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दोन महिला क्रिकेटर्सनं केलं लग्न

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट टीमची कॅप्टन डेन वेन निकेर्क आणि टीममधील ऑलराऊंडर मेरीजेन कॅप यांनी शनिवारी लग्न केलं. या समलैंगिक लग्नाला अर्ध्यापेक्षा जास्त टीम हजर होती.

Mumbai
ven and cap
सौजन्य - इन्स्टाग्राम

समलैंगिक विवाह ही संकल्पना आता बऱ्यापैकी रुळायला लागली आहे. काही देशांमध्ये या विवाहाला वैध मान्यता देण्यात आली आहे. तर काही देशांमध्ये अजूनही हा लढा चालू आहे. तुम्ही म्हणाल आता हे सगळं कशासाठी? तर दक्षिण आफ्रिकेच्या दोन महिला क्रिकेटर्सनं समलैंगिक लग्न केलं आहे. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट टीमची कॅप्टन डेन वेन निकेर्क आणि टीममधील ऑलराऊंडर मेरीजेन केप यांनी शनिवारी लग्न केलं. याआधी न्यूझीलंडच्या खेळाडू जोडी एमी सॅटर्थवाईट आणि ली तुहान यांनीदेखील लग्न केल्याचं समोर आलं होतं. ही समलैंगिक लग्न करणारी दुसरी जोडी ठरली आहे.

इन्स्टाग्रामवरून फोटो केला पोस्ट

केपनं आपल्या इन्स्टाग्रामवरून दोघींच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या दोघींच्या लग्नात दक्षिण आफ्रिकेच्या अर्ध्यापेक्षा महिला टीम उपस्थित होती. या लग्नात त्यांच्या टीममेट लिजेली ली आणि छलोए बुशी ट्रायोन यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. लग्नाच्या गाऊनमध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या.

दोघींनीही केली एकत्र करिअरला सुरुवात

केप आणि वेन निकर्कनं २००९ मध्ये महिला वर्ल्डकपपासून एकत्रच आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली होती. वेननं १६ व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तर दोन दिवसानंतरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत कॅपनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, मुलांच्या क्रिकेट अॅकॅडमीमध्ये सराव करणारी ही मुलींची पहिलीच जोडी आहे. तर या नवविवाहित दाम्पत्यानं स्वतःच्या देशाच्या बाहेर महिला बिग बॅश लीगमध्ये सीडनी सिक्सर्सकडूनदेखील खेळल्याची माहिती आहे. वेन आणि केपनं दक्षिण आफ्रिकेसाठी टी२० मध्ये तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत रेकॉर्डब्रेक भागीदारी केल्याची माहिती आहे.

 

 

?

A post shared by Marizanne Kapp (@kappie777) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here