घरक्रीडाफलंदाजांचे सामन्यातील प्रदर्शन निराशाजनक

फलंदाजांचे सामन्यातील प्रदर्शन निराशाजनक

Subscribe

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा संघ ९२ धावांत आटोपल्यानंतर आमच्या फलंदाजांनी या सामन्यात निराशाजनक प्रदर्शन केले अशी कबुली भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिली. रोहितचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. मात्र, या सामन्यात त्याला किंवा त्याच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही.

आमच्या फलंदाजांची दीर्घकाळातील ही सर्वात वाईट कामगिरी होती. आमचे फलंदाज इतके वाईट खेळतील अशी अपेक्षा नव्हती, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही श्रेय देणे आवश्यक आहे. त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करत आम्हाला चुका करण्यासाठी भाग पाडले, परंतु आम्हाला या गोष्टीतून शिकणे गरजेचे आहे. कधीकधी तुम्हाला संघ दबावाखाली असताना सावधपणे फलंदाजी करणे गरजेचे असते. या सामन्यात आम्ही तसे करू शकलो नाही. आम्ही सुरुवातीला चांगला खेळ केला. मात्र, त्यानंतर आमचे प्रदर्शन निराशाजनक होते, असे रोहित म्हणाला.

- Advertisement -

तसेच, फलंदाजांनी या सामन्यात जे फटके मारले त्यावर रोहित नाखुश होता. तुम्ही खेळपट्टीवर थोडा वेळ घालवलात तर त्यानंतर फलंदाजी करणे सोपे जाते, पण आमच्या फलंदाजांनी या सामन्यात खूप खराब फटके मारले, तसेच चेंडू खूप स्विंगही होत होता. आम्ही मागील काही काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात काय चुका झाल्या या सर्व खेळाडूंना माहीत आहेत. कधीतरी चेंडू खूप स्विंग होणार आणि फलंदाजी करणे आव्हानात्मक असणार, पण त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे, असेही रोहित म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -