घरक्रीडापूजा धांडाने पटकावले कांस्यपदक

पूजा धांडाने पटकावले कांस्यपदक

Subscribe

हंगेरीमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू पूजा धांडाने कांस्यपदक पटकावले.

हंगेरीमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू पूजा धांडाने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात पूजाने नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला १०-७ असे पराभूत केले. जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पदक मिळवणारी ती चौथी भारतीय महिला कुस्तीपटू आहे. पूजा आधी अलका तोमर (२००६), गीता फोगाट आणि बबिता फोगाट (२०१२) यांनी भारतासाठी कांस्यपदके जिंकली आहे.

अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील दुसरे पदक

पूजाचे हे यावर्षीचे दुसरे पदक आहे. याआधी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. तर भारताचे यावर्षीच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील दुसरे पदक आहे. भारताचा प्रमुख पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनियाने या स्पर्धेच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते.

आता लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये पदकाचे

या विजयानंतर पूजा म्हणाली, “मी माझ्या देशाला पदक मिळवून दिले याचा खूप अभिमान आहे. मी अंतिम सामन्यात सुरूवातीपासूनच चांगला खेळ केला. त्यामुळे मला आघाडी मिळाली आणि ती मी शेवटपर्यंत कायम ठेवली. बुलेन ही अप्रतिम खेळाडू आहे. त्यामुळे तिचा पराभव करणे सोपे नव्हते. पण मी हा सामना जिंकले याचा मला खूप आनंद आहे. आता माझे लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -