घरटेक-वेकअमेझॉन- फ्लिपकार्टला देणार टक्कर 'गुगल'ची शॉपिंग वेबसाईट

अमेझॉन- फ्लिपकार्टला देणार टक्कर ‘गुगल’ची शॉपिंग वेबसाईट

Subscribe

गुगल शॉपिंगच्या मदतीने ग्राहकांना वेगवेगळ्या ई- कॉमर्स वेबसाईट्सवर मिळणाऱ्या बेस्ट ऑफर्स एकत्र पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये रिटेलर्सचा समावेश देखील असणार आहे.

ऑनलाईन शॉपिंगच्या या काळात स्वस्त, मस्त आणि घरबसल्या वस्तू देण्यासाठी नव नव्या शॉपिंग बेवसाईट येतच असतात. आता यात आणखी एका वेबसाईटची भर पडणार आहे. गुगलने स्वत:ची शॉपिंग वेबसाईट आणली असून आता ती थेट अमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार आहे. गुगलने ई- कॉमर्स क्षेत्रात आपली पाळेमुळे घटट् रुजवण्यासाठी शॉपिंग वेबसाईट सुरु करत असून ग्राहकांना अगदी सहज वस्तू उपलब्ध होण्यासाठी ही शॉपिंग वेबसाईट आणत असल्याचे गुगलचे उपाध्यक्ष सुरोजीत चॅटर्जी यांनी सांगितले आहे.

सगळ्यात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन

आपण सगळेच जण काहीही शोधण्यासाठी गुगलचा सर्च इंजिनचा उपयोग करत असतो. या नव्या शॉपिंग वेबसाईटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना शॉपिंगसाठी मदत होणार आहे. तुम्ही घेणाऱ्या वस्तूची योग्य तुलना करुन ती वस्तू मगच तुम्ही खरेदी करु शकता. एखाद्या वस्तूवरील ऑफर्स तुम्हाला अगदी सहज कळू शकणार आहे.

- Advertisement -
shopping_website
गुगलवर मिळणार टॉप ऑफर्स

अशी करा गुगलवर शॉपिंग? 

गुगल शॉपिंगच्या मदतीने ग्राहकांना वेगवेगळ्या ई- कॉमर्स वेबसाईट्सवर मिळणाऱ्या बेस्ट ऑफर्स एकत्र पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये रिटेलर्सचा समावेश देखील असणार आहे. गुगल शॉपिंग ग्राहकांना सुटसुटीत खरेदीचा अनुभव देणार आहे. विशेष म्हणजे गुगलने या प्लॅटफॉर्मवर असे सेक्शन्स ठेवले आहेत ज्यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी होणे, टॉप डिल्स आणि गुगल शॉपिंग वेबसाईटवर असणाऱ्या टॉप डिल्स पाहू शकणार आहात.

काय आहे या शॉपिंग वेबसाईटवर ?

इतर शॉपिंग वेबसाईटप्रमाणे या गुगल मोबाईल फोन, स्पीकर्स, कपडे, पुस्तके, घड्याळे, गृह सजावट, पर्सनल केअर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -