घरटेक-वेकऐका 'मंगळा'वरील आवाज

ऐका ‘मंगळा’वरील आवाज

Subscribe

नासाने या आधी देखील मंगळ मोहीम केली आहे. पण ही मोहीम खास आहे. कारण हे यान मंगळाच्या अंतर्गत भागाचा जवळून अभ्यास करणार आहे. या आधी न उलगडलेला हा लाल ग्रह उलगड्याचे काम ही मोहीम करणार आहे

मंगळाच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करण्यासाठी नासाचे यान मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आणि आता मंगळावर हे यान फिरत असून या यानाने मंगळावरील आवाज पाठवला आहे. पृथ्वीवर वारे कसे वाहतात ? ते आपल्याला ठाऊक आहेत. पण मंगळावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाज आपण आजपर्यंत ऐकलेला नाही. नासाच्या ‘इनसाईट लँडर’ने हा आवाज रेकॉर्ड केला आहे आणि तो  पृथ्वीवरील लोकांनाही कळावा यासाठी तो युट्युबवर शेअर  करण्यात आला आहे.

वाचा- नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

असे वाहतात मंगळावर वारे

इनसाईट या यानाने पाठवलेल्या आवाजानुसार मंगळावर १० ते १५ mph( ५ ते ७ मिनिटे सेकंद) इतक्या गतीने वारे वाहतात. नासाने पाठवेल्या यानामध्ये हवा मापन यंत्र आहे. या यानाच्या दोन सेन्सरनी हा आवाज रेकॉर्ड केला आणि तो पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यान मंगळावर उतरल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला हा आवाज आहे. इम्पेरिअल महाविद्यालयाचे शोधकर्ते थॉमस पाईक या संदर्भात म्हणाले की, हा आवाज एखादा झेंडा हवेने फडफडावा, असा आहे.

- Advertisement -
 पाहा LIVE : काहीच तासात मंगळाचे दर्शन

म्हणूनच पाठवले इनसाईट यान

नासाने या आधी देखील मंगळ मोहीम केली आहे. पण ही मोहीम खास आहे. कारण हे यान मंगळाच्या अंतर्गत भागाचा जवळून अभ्यास करणार आहे. या आधी न उलगडलेला हा लाल ग्रह उलगड्याचे काम ही मोहीम करणार आहे. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी हे यान मंगळावर उतरले. या आधी देखील मंगळग्रहावरील वाऱ्यांचा आवाज १९७६साली मंगळग्रहावर उतरलेल्या नासाच्या यानाने पाठवला होता. पण तो आवाज कोणालाही ऐकू येईल असा नव्हता. त्यामुळे त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पण आता पाठवलेला आवाज अगदी स्पष्ट आहे.

ऐका मंगळ ग्रहावरील आवाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -