आता भारतात PUBG खेळता येणार? कोरियन कंपनीने चीनच्या ‘टेन्सेंट’कडून घेतला ताबा

pubg

भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव लोकप्रिय बॅटल गेम PUBG सह ११८ चीनी Apss वर बंदी घातली आहे. मात्र, PUBG गेम पुन्हा एकदा भारतात परतण्याची चिन्ह आहेत. PUBG मोबाईल गेमची फ्रँचाइझी ही चीनच्या ‘टेन्सेन्ट गेम्स’कडे आहे. भारताने बंदी घातल्यानंतर PUBG Corporation ने ‘टेन्सेन्ट गेम्स’ला पबजी मोबाइल गेमची भारतातील फ्रँचाइझी न देण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. यामुळे पुन्हा एकदा भारतात पबजी येणार अशी शक्यता आहे.

PUBG Corporation ने घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील पबजीवरील बंदी लवकरच हटवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PUBG Corporation ने टेन्सेंटकडून भारतातील फ्रेंचाइझी काढून घेतल्यानंतर ‘पबजी मोबाइल गेम’चाही संबंध चीनशी राहणार नाही. यामुळे पबजी पुन्हा एकदा भारतात परतू शकतो. केंद्र सरकारने PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite वर बंदी घातली आहे. म्हणजे केंद्राने दक्षिण कोरियाच्या नाही तर चिनी कंपनीचा संबंध असणाऱ्या PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite यांच्यावर बंदी आणली आहे. पण, मूळ पबजी गेम PUBG PC दक्षिण कोरियाचा असून अजूनही भारतात तो सुरूच आहे.

मुख्य पबजी गेम दक्षिण कोरियाच्या ‘पबजी कॉर्पोरेशन’चा आहे. पण, भारत आणि चीनमध्ये चीनची कंपनी टेन्सेंट गेम्स ‘पबजी मोबाइल’ आणि ‘पबजी मोबाईल लाईट’ या दोन गेम्सवर नियंत्रण ठेवतं. पण, भारताने बंदी घातल्यानंतर आता PUBG Corporation ने टेन्सेंट गेम्सकडून भारताची फ्रेंचाइझी काढून घेतली आहे.