घरटेक-वेकसॅमसंग Galaxy Note Seriesच्या इतिहासात 'हा' स्मार्टफोन असेल सर्वात महागडा!

सॅमसंग Galaxy Note Seriesच्या इतिहासात ‘हा’ स्मार्टफोन असेल सर्वात महागडा!

Subscribe

सॅमसंग कंपनी पुढच्या महिन्यात प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Note 20 Series लाँच करू शकेल. सॅमसंग कंपनी पुढच्या महिन्यात ५ ऑगस्टला Unpacked Event आयोजित करणार आहे. ज्यामध्ये प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करू शकेल. पुढील महिन्यात लाँच करणारा स्मार्टफोन हा Galaxy Note ता सर्वात महाग स्मार्टफोन असू शकतो, असे म्हटले जात आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातील Galaxy S20 सीरिज लाँच केली. ही सीरिज अल्ट्रा प्रीमियम प्राइम रेंजमध्ये लाँच केली होती. या सीरिजमध्ये पहिल्यांदा Galaxy S20 Ultra ला इंट्रोड्यूस केले होते. सॅमसंग आपल्या पुढच्या प्रीमियम सीरिजमध्ये Galaxy Note 20 Ultra लाँच करू शकते. यापूर्वी याबाबत बऱ्याच लिक्स देखील समोर आल्या आहेत.

Samsung Galaxy Note 20 Seriesचे अधिकृत बाबी काही दिवसांपूर्वी समोर आल्या आहेत. कंपनी या स्मार्टफोन सीरिजसोबत Qualcomm Snapdragon 865+ SoC सादर करू शकते. हे Samsung Galaxy S20 मध्ये वापरलेल्या Qualcomm Snapdragon 865 SoC पेक्षा चांगले असेल. कंपनी या प्रोसेसर सोबत आपल्या पुढच्या सीरिजला अमेरिका आणि चीनमध्ये लाँच करणार आहे. इतर बाजारामध्ये कंपनी आपला स्मार्टफोन Exynos 992 SoC लाँच करेल. हे Galaxy S20 Seriesमध्ये वापरलेल्या Exynos 990 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे.

- Advertisement -

Galaxy Note 20 Seriesमध्ये तीन स्मार्टफोन्स Galaxy Note 20, Note 20+ आणि Note 20 Ultra लाँच केले जाऊ शकतात. फोनच्या प्रीमियम व्हेरिएंटमध्ये क्वार रियर कॅमेरा सेट अप दिला जाऊ शकतो. तर ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप कंपनीच्या बेस आणि प्लस व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. सॅमसंग या सीरिजच्या बॅकला Galaxy S20 Series सारखा स्क्वॉयर डिझाईनसह रियर कॅमरा दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये S-Pen ला देखील अपग्रेड केले जाऊ शकते. शिवाय यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंस फिचर्स पण इंटिग्रेट केले जाऊ शकतात. फोनच्या प्रीमियम व्हेरिअंटमध्ये 108MP दिला जाऊ शकतो. सोबत डिस्प्लेमध्ये इंप्रूवमेंट झालेली पाहायला मिळले. या आगामी स्मार्टफोनचे संभाव्य फिचर्स पाहून हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की, कंपनीच्या Galaxy Note Seriesच्या इतिहासातील हा सर्वात महागडा स्मार्टफोन असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -