घरटेक-वेकअबब! सॅमसंगच्या नव्या फोनची किंमत...

अबब! सॅमसंगच्या नव्या फोनची किंमत…

Subscribe

सॅमसंग गॅलेक्सी डब्ल्यू२०१९ हा नवा फोन चीनमध्ये लाँच केला असून भारतीय चलनाप्रमाणे याची किंमत १ लाख ९० हजार आहे. जाणून घेऊया काय आहेत याचे फीचर्स?

सध्या बाजारामध्ये विविध तऱ्हेचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी नवनवीन फिचर्सने फोन बाजारात घेऊन येत आहे. आता सॅमसंगने आपला नवा गॅलेक्सी W2019 फ्लिप मोबाईल चीनमध्ये लाँच केला आहे. मात्र त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. कारण या मोबाईलची किंमत आहे १ लाख ९० हजार. मागच्या वर्षी सॅमसंगने बाजारात आणलेल्या गॅलेक्सी W2018 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. मोबाईल निर्माण क्षेत्रामध्ये सॅमसंग कंपनीदेखील अग्रेसर आहे. त्यामुळे उत्तम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह हा मोबाईल सॅमसंगने बाजारात आणला आहे.

- Advertisement -

काय आहेत फीचर्स?

सॅमसंगच्या या महाग फोनमध्ये ४.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. दोन कॅमेरा असून यामध्ये ६ जीबी रॅम आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसंच मोबाईल एका हाताने ऑपरेट करण्यासाठी करण्यासाठी टी – ९ कीपॅडदेखील लावण्यात आलं आहे. तसंच त्यामध्ये मिरर ग्लासही लावण्यात आली आहे. ३०७० एमएएच बॅटरी असून अँड्रॉईड ८.१ ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. शिवाय दोन रेअर कॅमेरा असून प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सल आणि सेकंडरी सेन्सरदेखील १२ मेगापिक्सल आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आले आहे. याची किंमत सध्या १८९९९ चीनी युआन अर्थात भारतीय १ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, कंपनीने हा मोबाईल भारतामध्ये लाँच केला नाही. चीनमध्ये ६ जीबी आणि १२८ स्टोरेज आणि ६ जीबी २५६ जीबी स्टोरेज या दोन्ही वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर यामध्ये रोझ गोल्ड आणि प्लॅटीनम हे दोन रंग आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -