घरमुंबईतपशीलाची पडताळणी करण्याची नवी मुंबईकरांना सोय : सिडको

तपशीलाची पडताळणी करण्याची नवी मुंबईकरांना सोय : सिडको

Subscribe

सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वेक्षणातून प्राप्त तपशीलाची माहिती टाकण्यात आली आहे. या माहितीत कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास त्याची पडताळणी करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सिडको निर्मित सदनिका आणि दुकानांचा अद्ययावत तपशील जमा करण्यासाठी सिडकोतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सर्व तपशील सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती असल्यास त्याची पडताळणी करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिडकोतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी संकेतस्थळावरील सदर माहितीची पडताळणी करून त्यात विसंगती आढळल्यास दुरूस्तीसाठी सिडकोच्या सांख्यिकी विभागात अर्ज करायचा आहे.

हेही वाचा – अर्जदारांना सिडकोच्या संकेतस्थळावरून इरादापत्र डाऊनलोड करण्याची सुविधा

- Advertisement -

सिडकोकडून सदनिका आणि दुकानांची नोंद

सिडको महामंडळाने सिडकोच्या स्थापनेपासून ते आजतागायत विविध गृहनिर्माण योजना राबविलेल्या आहेत. सदर गृहनिर्माण योजनेतील सदनिका / दुकाने यांची अद्ययावत संगणकीय माहिती संकलित करणे आवश्यक होते. सिडकोतील विविध संबंधित विभागांकडे सदर माहिती उपलब्ध आहे. तसेच नवी मुंबई महानगर पालिका, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे यांच्याकडे देखील सदर माहिती उपलब्ध असते. या सर्व माहितीचे एकत्रीकरण करून नोंदी तपासून माहिती अद्ययावत करावयाची होती.

अशा प्रकारे सिडकोने केली नोंद

सिडको महामंडळाने विविध नोड्समध्ये बांधलेल्या सदनिकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी मे. धृव कन्सल्टंसी सर्व्हिसेस लि. या एजन्सीला सर्वेक्षण करण्यासाठी नेमले होते. या सर्वेक्षणासाठी सिडकोने एक प्रश्नावली तयार केली. प्रश्नावलीचा अनुक्रमांक हाच एससीटी आणि एससीएस या दोन प्रकारांमध्ये विभागून निवासी आणि वाणिज्य वापराच्या संकुलांसाठी निश्चित करुन प्रत्येक मालमत्तेच्या प्रवेशद्वारावर दर्शनीय ठिकाणी मार्करने लिहिण्यात आले. प्रत्येक मालमत्तेच्या प्रवेशद्वारावर दर्शनीय ठिकाणी मार्करने लिहिण्यात आलेल्या क्रमांकाची प्रश्नावली एजन्सीच्या प्रतिनिधींमार्फत सदनिकाधारक आणि दुकानदार यांच्याकडून भरून घेण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – आता मोबाईलरवही करा सिडकोच्या घराची नोंदणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -