फोनमधील हे ‘सिक्रेट कोड्स’; तुम्हाला माहितीयेत का?

फोनमधलं किंवा फोनच्या सिस्टीमविषयी एखादं फंक्शन ऑपरेट करताना हे सिक्रेट कोड्स वापरले जातात.

Mumbai
प्रातिनिधिक फोटो
आजकाल अँड्रॉईडफोन आणि स्मार्टफोनचा वापर जवळपास सगळेच लोक करतात. सहसा अँड्रॉईड किंवा स्मार्टफोन कसे वापरायचे याची माहिती युजरला असतेच पण याच स्मार्टफोनमध्ये काही ‘सिक्रेट कोड्स’ही असतात. हे सिक्रेट कोड्स वेगवेगळ्या शॉर्टकर्ट्सप्रमाणे वापले जातात. फोनमधलं किंवा फोनच्या सिस्टीमविषयी एखादं फंक्शन ऑपरेट करताना हे सिक्रेट कोड्स वापरले जातात. 

सिक्रेड कोड्स आणि त्यांचा फायदा

 

*2767*3855#

हा कोड डायल केल्यानंतर तुमचा फोन लगेच रिसेट होतो. मात्र, या प्रक्रियेत तुमची फोन मेमरी पूर्णत: डिलीट होते. त्यामुळे याचा वापर जरा जपूनच.


*#*#2664#*#*

या कोडच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या फोनचा टच स्क्रीन टेस्ट करू शकता. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या फोनचा टच व्यवस्थित काम करतो आहे की नाही हे समजतं.


*#*#34971539#*#*

हा कोड डायल केल्यानंतर तुम्हाला फोनच्या कॅमेराविषयी संपूर्ण माहिती मिळते.


*#*#0842#*#* 

या कोडच्या मदतीने तुम्हाला फोनचं व्हायब्रेशन चेक करता येतं.

‘फोल्ड’ होणारा स्मार्टफोन; पाहा भन्नाट फिचर्स

*#21#

हा कोड डायल केल्यानंतर तुमचे मेसेज, कॉल किंवा डेटा दुसरीकडे कुठे डायव्हर्ट होतो आहे का, याविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता.

*#62#

बरेचदा तुमच्या नंबरवर No Service किंवा No Answer असं सांगितलं जातं. अशावेळी हा कोड डायल केल्यास या कोडच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुमचा नंबर दुसऱ्या नंबरवर रिडायरेक्ट केला गेला आहे का…

##002#

 तुम्हाला असं वाटत असेल की की तुमचा कॉल डायवर्ट करण्यात येत आहे, तर तुम्ही हा कोड डायल करु शकता. या कोडच्या मदतीने अँड्रॉईड फोनचे सर्व फॉरवर्डिंग डी-अॅक्टिव्हेट करता येतं.

*43#

तुम्हाला फोनमध्ये कॉल वेटिंग सर्व्हिस सुरु करायची असल्यास हा कोड डायल करा. #43# डायल करुन तुम्ही ही सर्व्हिस बंद करु शकता.

महत्वाची सूचना: वरील सर्व डायल कोड्स तुमच्या अँड्रॉईड फोनच्या व्हर्जननुसार काम करतात. प्रत्येक फोनमध्ये प्रत्येक कोड लागू होईलच असं नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here